तहसील कार्यालयातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान.
उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगे यांचे हस्ते करण्यात आले सन्मानित.
महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात झाला सन्मान
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयात महसुल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला यानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येऊन तहसील कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी
तहसील कार्यालय सभागृहामध्ये उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या अध्यक्षतेखाली महसुल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी,तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत राजनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पुरवठा निरीक्षक शितल राठोड यांनी केले.यावेळी
तहसील कार्यालयातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. यामध्ये नायब तहसीलदार बबन राठोड, मंडळ अधिकारी प्रमोद
ढवळे, मंडळ अधिकारी मंगेश मार्कंड, तलाठी संदीप सुरजुसे, तलाठी स्वप्नील देशमुख, तलाठी आरती कनोडीया,अव्वल कारकून गौरव लोखंडे, अव्वल कारकून विजय दरोळी, महसुल सहायक. उज्वला हनवते, महसुल सहायक निरंजन मनोहरे,कर्मचारी कविता पुंड, मेघा ढोकणे,पोलीस पाटील संजय जुनघरे, पोलीस पाटील, गोपाल दहातोंडे,संदीप डोलकर आणि दामोधर थोरात या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
Comments