फॅमिली डाँक्टरची संकल्पना हरवली......
प्रत्येक वेळी रुग्ण नव्या डाँक्टरच्या शोधत
दोन दशकांपूर्वी असायचा एक फॅमिली डॉक्टर
उत्तम ब्राम्हणवाडे
गेल्या दोन दशकांपूर्वी प्रत्येक कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर असायचा. आजार लहान असो वा मोठा प्रत्येक दुखण्यासाठी फॅमिली डॉक्टरचा सल्लाच महत्त्वाचा होता. मात्र, आता प्रत्येक आजाराला वेगळा डॉक्टर, आजार बरा न झाल्यास आणखी दुसरा डॉक्टर, अशी संकल्पना रुजू लागली आहे. प्रत्येवेळी वेगळ्या डॉक्टरच्या शोधात मात्र , फॅमिली डॉक्टरची संकल्पना हरवली आहे.
जनरल फिजिशियन म्हणून प्रत्येक कुटुंबाचा एका फॅमिली डॉक्टर असतो. फॅमिली डॉक्टरांशी संवाद, त्याच्यावरील विश्वास यामुळे दवाखान्यात जाताच रूग्णाला बरे वाटू लागते. मात्र, ही फॅमिली डॉक्टरची संकल्पना मोडकळीस निघाली. त्यामुळे आजार झाल्यास प्रत्येक वेळी वेगळ्या डॉक्टरांकडे जाण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी, पूर्वीप्रमाणे रुग्ण व डॉक्टरांमधील संवाद, त्यांच्यातील विश्वास पूर्वीसारखा राहिला नसल्याचे चित्र दिसून येते. शिवाय, डॉक्टरांनाही रूग्णावर उपचार करण्यात अडचणी येत असल्याचे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
दुखणे छोटे आणि उपचार मोठा.
अनेकदा दुखणे लहान असते. मात्र, डॉक्टरांनाही रुग्णाविषयी फारशी माहिती नसल्याने विविध चाचण्या केल्या जातात. त्यासाठी रुग्णाला आर्थिक फटकाही बसतो. या उलट फॅमिली डॉक्टरांना रुग्णाविषयी पूर्ण माहिती असल्याने गरज असेल, तरच ते विविध चाचण्या किवा मोठ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत मार्गदर्शन करतात.
म्हणूनच आहे फॅमिली डॉक्टरचे महत्त्व.
रुग्ण आणि डॉक्टराचा संवाद आणि त्यामुळे निर्माण झालेला विश्वास कुटुंबातील प्रत्येक रुग्णाची फॅमिली डॉक्टरला असते पूर्ण माहिती. त्यानुसार योग्य उपचारही शक्य. आजार मोठा असेल, तर योग्य समुपदेशन आणि पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन. चुकीच्या उपचाराची शक्यता कमी असते.
संवाद दुरावल्याने विश्वासही उडाला.
प्रत्येक वेळी वेगळ्या डॉक्टरकडे जाणाऱ्या रुग्णांचा डॉक्टरांसोबतच पाहिजे तसा संवाद होत नाही. त्यामुळे रुग्णाला आणखी आजार आहेत का?
त्या विषयी डॉक्टरांना फारशी कल्पना येत नाही, त्याचा उपचारावर परिणाम दिसून येतो. परिणामी रूग्णाचा डॉक्टरांवरील विश्वास उडतो. त्यामुळे रूग्ण पुन्हा दुसऱ्या डॉक्टरच्या शोधात फिरतात.
Comments