सेमिस्टर पद्धतीमुळे गरीब विद्यार्थी उच्चशिक्षणापासून वंचित - डॉ नितीन टाले.
प्रा राजाभाऊ देशमुख कला महाविद्याल्यात पदवी वितरण समारंभ संपन्न !
उत्तम ब्राम्हणवाडे
सेमिस्टर पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक भूर्दन्ड पडत असून वर्षातून दोनदा परीक्षा फी व प्रवेश फी भरण्याची क्षमता नसणारे गरीब विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहे. तसेच महाविद्यालयात वर्षभर केवळ परीक्षा हा एकमेव विषय राहत असून विद्यार्थी केवळ परीक्षाजीवी बनत आहेत.
अध्यापन व अभ्यासेतर उपक्रमांकरिता वेळच अपूर्ण पडतो. त्यामुळे सर्व विद्यार्थी संघटनांनी एकजुटीने सेमिस्टर पद्धतीला सर्व स्तरातून विरोध करावा असे मत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ नितीन टाले यांनी व्यक्त केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सलग्नं विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित प्रा राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
प्राचार्य पी एच सूर्यवंशी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या समारंभकारिता माजी विद्यार्थी असोसियेशन चे अध्यक्ष प्रा नितिन टाले, पदाधिकारी प्रयोगशील शेतकरी विकास सरोदे, प्रमोद परसनकर, अजिंक्य तर्हेकर, शीतल रोकडे, दिनेश धवस, रुपेश फुके, उमेश चव्हाण यांचे हस्ते उन्हाळी /2022 बी ए व एम ए उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली.विद्यापीठ गीताने पदवी वितरण कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रा व्ही.ए.चौधरी यांनी प्रस्ताविक भाषणातून कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली.
स्वातंत्र्याच्या अमृतकाळात समाजाचे जोखीमदार व भागीदार होऊन उत्तम नागरिक बनावे असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य सूर्यवंशी यांनी केले. प्रा चंदा जगताप, प्रा अनिता सोनुले, प्रा रमेश जाधव, प्रा गौतम सातदिवे, प्रा राजेश मेश्राम, गजानन काळे, नंदू काजे, शुभम फुटाणे या प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निवेदन व आभार प्रा निलेश गोरे यांनी केले. योगेश झिमटे, दहातोंडे, जयस्वाल, मोरे, ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता परिश्रम घेतले.
Comments