जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची मलकापूर गावाच्या पुनर्वसनला भेट.
निम्न साखळी प्रकल्प धरण व शेती नुकसानीची केली पाहणी.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मलकापूर गावाला आज दिनांक 3/8/2023 या दिवशी मलकापूर गावाला भेट देऊन तेथील नवीन झालेल्या निम्न साखळी प्रकल्प धरण फुल भरले असून त्या साखळी धरणाचे पाणी गावात लगत आल्याने गावकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात भीती आहे व आमच्या गावांचे लवकर पुनर्वसन व्हावे व गावाला पूर्णपणे पाण्याचा वेढा बसलेला आहे गावकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आमचे गाव छोटेसे असून साहेब याचे पुनर्वसन करण्यात यावे याआधी पाटबंधारे विभागांनी मलकापूर ढेंगाळा या दोन गावचे पुनर्वसन करण्याचे ठरविले होते मलकापूर या गावचे चार ते पाच दिवस मोजमापन केले होते परंतु त्यांच्या हलगर्जीपणामुळे हे गाव पुनर्वसन मधून वगळले असे सर्वत्र गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना समस्या सांगितले तसेच पाटबंधारे विभागाने नदी धरणाकाठच्या ज्या जमिनी भूसंपादित केल्या नाहीत त्यामध्ये पाण्याची थोप जाऊन खूप नुकसान झालेले आहे अद्यापहीशेतीमध्ये पाणी आहे करिता त्या जमिनी भूसंपादित कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली जिल्हाधिकारी साहेबांनी निम्न साखळी धरणाची व मलकापूर गावाची पाहणी केली सोबतच उपविभागीय अधिकारी. तहसीलदार .पाटबंधारे विभागाचे अधिकारी. उपस्थित होते व गावकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या व समस्यांचे समाधान केले लवकरच कार्यवाही करू असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले दि 25 जुलै रोजी नितेश कानबाले व गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असता साहेब तुम्ही आमच्या गावाला भेट द्या विनंती केली असता आज जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या गावाला भेट दिली गावातील सर्वत्र नागरिकांनी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले.. त्यावेळी गावातील उपस्थित नागरिक नितेश कानबाले संजय कानबाले मंगेश कानबाले महेंद्र शिंदे कमलेश शिंदे गणेश शिंदे ज्ञानेश्वर कानबाले सतीश कानबाले रोशन मेश्राम प्रवीण चौधरी दिवाकर परणकर विष्णू गिरी जयेंद्र कानबाले निखिल कांबळे प्रशांत थोर.
Comments