शेतकऱ्यांना कर्जासाठी कोणतीही शिफारस लागणार नाही.

.बच्चु कडू यांचे प्रतिपादन. 

 नांदगाव खंडेश्वर येथे सत्कार सोहळा संपन्न.

उत्तम ब्राम्हणवाडे.

अमरावती जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज लागल्यास त्या शेतकऱ्यांना आता बँकेच्या संचालकासह कुणाच्याही शिफारसींची आवश्यकता नसेल कर्जासाठी शेतकऱ्यांनी थेट तालुक्यातील शाखेशी सपर्क करावा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी बँकेच्या चकरा सुद्धा मारू नये.कर्ज मंजूर झाल्याबरोबर कर्जदारांना सेवा सहकारी सोसायटी मार्फत घरपोच चेक वाटप करण्यात येईल असे प्रतिपादन अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी नांदगाव खंडेश्वर येथील सत्कार समारंभात बोलत असताना केले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही जिल्ह्यातील सर्व सेवा सहकारी सोसायटीना बळकट करणार आहोत नांदगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८७ कोटीच्या ठेवी असणे ही एक अभिमानाची बाब म्हणावी लागेल आम्ही बँकेमार्फत आता शिक्षण,आरोग्य,यावर लक्ष केंद्रित करणार आहोत आम्ही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांना आता बँकेत येण्याची गरज आम्ही ठेवणार नसून त्यांना सर्व सुविधा त्यांच्या गावातील सेवा सहकारी सोसायटी मार्फत देणार आहोत त्यामुळे सोसायट्या सुद्धा बळकट होईल असे सुद्धा आ.बच्चु कडू म्हणाले,नांदगाव खंडेश्वर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनियुक्त संचालक मंडळाच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील अनेक महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बँकेचे नवनियुक्त उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनीसुद्धा उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.सभेचे संचालन विलास मारोटकर प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल तर आभार प्रदर्शन. शाखा व्यवस्थापक एस.एस.कणसे यांनी मानले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे संचालक रवींद्र गायगोले,जयप्रकाश पटेल,आनंद काळे,अजय मेहकरे हे 
उपस्थित होते.या कार्यक्रमाला तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बँकेच्या शाखेचे आर.पी. कापसे, व्ही. एम.थोरात, एस.आर.सातपुते, विजया गद्रे,कविता बावणे,राजू जंगले,राजू रुमने,भीमराव रंगारी, वहिदभाई, स्वप्नील मोहोड यांनी अथक परिश्रम घेतले.यावेळी तालुक्यातील महिला शेतकरी मंदा भारती,अलका महल्ले,संगीता ठाकरे,सुनंदा काजे,कुसुम लोंढे,यांचा साडी,चोळी,आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

Comments

Anonymous said…
Great Job

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात