शहिदांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य तुम्हा-आम्हाला जपता आले पाहिजे:--सरपंच विशाल मेश्राम.
माझी माती- माझा देश, या अभियानाला गट ग्रामपंचायत खिरसाना येथील जनतेचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद.
उत्तम ब्राम्हणवाडे
केंद्र सरकार च्या निर्देशनानुसार सर्व देशभर आझादी का अमृत महोत्सव समारोपाच्या निमित्तानेक्रांतिदिनापासून कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत खिरसाना यांच्या वतीने टिमटाला येथील युटिलिटी सेंटर येथे "मेरी मिठ्ठी- मेरा देश" कार्यक्रमाअंतर्गत शिलाफलक प्रणप्रतिष्ठा व पूजन सरपंच विशाल मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
व सर्व उपस्थितींना पंचप्रण शपथ यावेळी देण्यात आली. उपस्थित सरपंच साहित ग्रा पं. सदस्य विशाखा ताई पोटे,सुशीला सोनोने, सुलोचना तिडके, संजय सहारे, विशाल गावंडे,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मा श्रीपाल सहारे, पोलीस पाटील राजेंद्र राठोड,पंचायत समिती माजी सदस्य सुधाकर डोंगरे,अशोक चव्हाण सोबतच इतरही ग्रामस्थांनी ७५ देशी झाडांची लागवड केली.
त्यांनतर गावातील पॅरॅमिलीटरी फोर्स मध्ये नव्याने रुजू झालेले सुरज वासुदेव माहोरे यांच्या वतीने त्यांच्या लहान भावाचा अर्थातच आशिष माहोरे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सरपंच विशाल मेश्राम यांनी सत्कार केला.
त्यांनतर महिला बालकल्याण विकास निधी अंर्तगत खिरसाना निरसाणा आणि टिमटाला येथील अंगणवाडी मधील लहान मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. त्यानंतर माजी पंचायत समिती सदस्य सुधाकरराव डोंगरे आणि पत्रकार श्रीपालजी सहारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात सरपंच विशाल मेश्राम यांनी संपूर्ण ग्रामस्थांना संबोधित करत हा देश गुलामगिरी मधून मुक्त व्हावा या साठी कित्येक तरुणांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली.
देश स्वातंत्र्य व्हावा म्हणून शहीद झाले,त्यांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य तुम्हा आम्हला जपता आले पाहिजे असे प्रतिपादन ते यावेळी करत होते. या सुंदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी शारदाताई चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका भिमटे मॅडम, लोणकर मॅडम सरोदे मॅडम,चव्हाण सर,अवघड सर,ग्रा पं. सदस्य विशाखा ताई पोटे,सुशीला सोनोने, सुलोचना तिडके, संजय सहारे, विशाल गावंडे,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मा श्रीपाल सहारे, पोलीस पाटील राजेंद्र राठोड,पंचायत समिती माजी सदस्य सुधाकर डोंगरे,अशोक चव्हाण,नरेंद्र पोटे, बंटी पोहेकर, ज्ञानदेव जगताप, मनोज वैद्य, विनोद वानखडे,योगेश बनसोड, राजकुमार चव्हाण, अशोक राठोड, सुनिता पोहेकर, पुष्माबाई सयाम,अंजली मालथाने, रूपाली डवरे,रेश्मा ठाकरे, कल्पना ठाकरे सोबतच इतरही ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments