200 रू कीलोचे टोमॅटो आले 40 रुपये किलोवर
.
बाजारात आवक वाढल्याने नागरिकांना दिलासा
उत्तम ब्राह्मणवाडे
.जून आणि जुलै महिन्यात 200 रुपये किलोवर पोहोचलेल्या टोमॅटोचा भाव गेल्या आठवड्यापासून बाजारात आवक वाढल्याने आता 40 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने गेल्या दोन महिन्यांत टोमॅटोच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला होता. किचनमध्ये रोज वापरले जाणारे टोमॅटो विकत घेणे सर्वसामान्यांना जवळपास अशक्य झाले होते. त्यामुळे अनेकांच्या भाजीतून टोमॅटो गायब झाला होता. सर्वसामान्य माणूस एक किलो टोमॅटो खरेदी करत असताना महागाईच्या काळात टोमॅटोची एक पाव विकत घेऊ लागला. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. दर कमी झाल्याने लोकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
बाजारात बहुतांश भाज्यांची आवक वाढली असली तरी काही भाज्या अजूनही महाग आहेत. मात्र आताही काही भाज्यांचे भाव 100 च्यापुढे गेले आहेत. कोबी, वांगी, सिमला मिरची, हिरवी मिरची, भेंडी आदींचे भाव चांगलेच घसरले आहेत. तर आले, लसूण व इतर भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. आल्याचा भाव 240 रुपये किलो असल्याने गृहिणींचे बजेट वाढले आहे. दरम्यान, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक आठवडी बाजारात शेतकऱ्यांकडून भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत.
आले, लसूण महाग, कांद्याचे भाव वाढले
गेल्या काही दिवसांपासून आल्याच्या दरात वाढ होत आहे. गेल्या दोन महिन्यांत 80 ते 120 रुपये भाव असलेले आले आता 200 ते 240 रुपये किलोने विकत घेतले जात आहे, तर कांद्याच्या दरातही वाढ होत आहे. बाजारात कांद्याला 40 ते 50 रुपये किलोचा भाव आहे.
भाज्यांचे दर
टोमॅटो 30-40
मिरची 50
शिमला मिरची 40
कडू 30
वांगी 30
फुलकोबी 50-60
मेथी 40-60
टोमॅटो स्वस्त झाल्याने दिलासा
या दोन महिन्यात टोमॅटोसोबत- इतर भाज्याही स्वस्त झाल्याने दिलासा मिळाला आहे. टोमॅटो प्रमाणे आले आणि लसूण देखील स्वस्त असावे.
जयश्री मोरेश्वर दिवटे, गृहिणी.
भाज्यांच्या किमती कमी झाल्याने ग्राहक वाढले.
.. दोन महिन्यांपूर्वी भाज्यांचे भाव गगनाला भिडले होते, त्यानंतर ग्राहक पूर्णत: कमी झाले होते.. मात्र आता भाज्यांचे दर स्थिर झाले असून, भाव कमी झाल्याने ग्राहक वाढले आहेत. ज्याप्रमाणे टोमॅटो आणि इतर भाज्यांचे भाव उतरले आहेत, त्याचप्रमाणे आले आणि लसूणचेही भाव खाली आले पाहिजेत. त्यामुळे ग्राहकही वाढतील.
निलेश गांडोळे, भाजी विक्रेते,
नांदगाव खंडेश्वर
Comments