परिस्थितीवर मात करून तुषार झाला कृषी उपसंचालक.
तुषारची मिरवणूक काढून गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत.
उत्तम ब्राम्हणवाडे
घरची जेमतेम परिस्थितीअसतानाही तुषार ढंगारे ने एम पी एस सी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. या यशाने भारावून जाऊन गावकऱ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती व सुभाष चौकातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्याची गावातून जंगी मिरवणूक काढून स्वागत केले. व तुषार प्रति असलेल्या प्रेमाची पावती दिली.
तुषार ने कोणत्याही क्लासेसचा सहारा न घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवेतील उपविभागीय कृषी अधिकारी (कृषी उपसंचालक) परीक्षेत राज्यातून खुल्या प्रवर्गातून २५वा व ओबीसी मधून सहाव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला. ही बातमी गावातील त्याच्या मित्र परिवाराला कळताच तुषारची मिरवणूक काढून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.
या मिरवणुकीचे आयोजन माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर,अभिषेक संजयराव पारसकर,ऋषिकेश मारोटकर,सागर लाड, आकाश गटुले, ओम मारोटकर, भूषण डोक, अक्षय गूल्हाने, अक्षय मारोटकर, शुभम मोकळेकर, उमेश सोनोने हे आयोजन समितीत होते. या मिरवणुकीत विठ्ठलरावजी चांदणे, अमोल धवसे, प्रकाश मारोटकर, डॉ.संजय जेवडे,अशोक दैत,
गजानन मारोटकर, अजय लाड, गजानन डोक, तसेच माहात्मा ज्योतिबा फुले,संत गाडगे बाबा व डॉ.पंजाबराव देशमुख अभ्यासिकाचे सर्व विद्यार्थी या मिरवणुकीत महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती व सार्वजनिक गणेश मंडळ सुभाष चौक येथील सर्व कार्यकर्ते तसेच गावातील बरीच मंडळी मिरवणुकीत सहभागी झाली होती. बऱ्याच दिग्गजानी तुषार वर कौतुकाचा वर्षाव केला. सर्वसामान्य कुटुंबातील तुषारने मिळवलेले घवघवीत यश पाहून भारावून ठाणेदार विशाल पोळकर यांनी स्वागत करून त्याच्या मिरवणुकीच्या रथाचे काही काळ सारथ्य केले.तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांनी तुषारचे स्वागत केले.
Comments