ताला ठोको आंदोलनाने प्रशासन खळबळून जागे.
शिवणी रसुलापूर ग्रामस्थांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य.
उत्तम ब्राम्हणवाडे
शिवणी रसुलापूर येथील ग्राम विकास संघर्ष समितीच्या वतीने कॉ.उमेश बनसोड यांच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या ग्रामपंचायतला ताला ठोको आंदोलनाची दखल घेऊन प्रशासन खळबळून जागे झाले. गावकऱ्यांनी शेतीची कामे व मजूरी बंद ठेवून आंदोलन सहभाग दर्शविला.
त्यांनी ग्रामवासीयांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या.
दिनांक 11 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय शिवणी रसुलापूर येथे आंदोलन करण्यात आले.
ग्रामसभा ह्या ग्रामस्थांच्या सोयीनुसार मारुती मंदिर चौक आठवडी बाजार शिवणी रसुलापूर येथेच घेण्यात याव्या ही मागणी ग्रामपंचायत अधिनियमानुसार मान्य करण्यात आली. ग्रामपंचायतच्या पदाधिकारी व प्रशासनाने मनमानी न करता सर्व समावेशक ग्रामस्थांच्या हिताचे रक्षण करावे त्या अनुषंगाने मालमत्ता नमुना व आठ (अ) संदर्भात दस्तावेज यावरील सचिव वापरत असलेले प्रमाणपत्राच्या शिक्याचा वापराबाबत मासिक सभेत चर्चा करून त्यानुसार शिक्का वगळण्याबाबत कारवाई करावी.
नमुना आठ अ बाबत शिक्क्याऐवजी क्षेत्राचा उल्लेख करण्यात मासिक सभेत चर्चा करावी असे लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले.
गावणेर तळेगाव येथील शेत सर्वे नंबर 244 ची कायदेशीर चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी या मागणीबाबत ग्रामसभेने घेतलेल्या ठरावानुसार चर्चा करावी व तपास करावा असे ठरविण्यात आले.
1995-96 तसेच त्यानंतर आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या घरकुल जागेचे मालमत्ता हक्क त्या त्या वेळेच्या नियमानुसार नमुना आठ अ प्रमाणे त्यांच्या ताब्यात असलेल्या क्षेत्राचे महसूल विभागाचे सातबारा नोंद घेण्या करता सभेत चर्चा करून संबंधित यंत्रनेकडे पाठवण्यात यावे असे लेखी स्वरूपात गटविकास अधिकारी दिलीप नाटकर पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांनी लिहून दिले.
ग्राम विकास संघर्ष समितीच्या वतीने संयोजक उमेश बनसोड, मनोज गावंडे,
विनोद तरेकर, गजानन धुमनखेडे, प्रफुल्ल मंदुरकर,चित्रा वंजारी,सोनुताई वैद्य,माधव ढोके, किशोर धुमनखेडे व संपूर्ण गावकऱ्यांनी सहभाग दर्शविला.
Comments