संत साहित्य आणि शिक्षणप्रणाली यामध्ये सुयोग्य सांगड घातल्याशिवाय भारत विश्वगुरु होणार नाही.
प्रा.पंढरीनाथ पाटील यांचे प्रतिपादन.
उत्तम ब्राम्हणवाडे
तंत्रज्ञान व भौतिक प्रगतीच्या काळात अनेक प्रश्न निर्माण झालेत. जल, जमीन व जंगल यामध्ये संतुलन बिघडत चालले आहे. नविन शिक्षण पद्धतीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगितेतून विद्यार्थ्यांचे उत्तम मूल्यवर्धन होईल.
आणि म्हणूनच शिक्षणप्रणाली व संत साहित्य यांची सांगड घातल्याशिवाय भारत विश्वगुरु होणार नाही असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा पंढरीनाथ पाटील यांनी केले. प्रचारभीष्म शामरावदादा मोकदम स्मुर्ती ग्रामगीता याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुफताना प्रा पाटील बोलत होते.
राष्ट्रसंतांची सामाजिक व शैक्षणिक क्रांती हा याख्यांनाचा विषय होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य ह भ प हरिभाऊ वेरूळकर हे होते.प्रचारभीष्म शामरावदादा मोकदम जन्मशताब्दी आयोजन केंद्रीय समिती यांच्या दाननिधीतून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व प्रा राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय, मराठी विभाग आणि आय कयू ए सी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली.प्रतिमापूजन, स्वागत व सत्कारानंतर प्राचार्य डॉ प्यारेलाल सूर्यवंशी यांनी प्रास्तविकपर भाषण केले. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आयोजन समिती अध्यक्ष मधुभाऊ घारड यांचे याप्रसंगी समयोचित भाषण झाले.याप्रसंगी नीलकंठ गुरुजी जेवडे व नारायण वैष्णव यांचा संत चळवळीतील योगदानबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचलन प्रा रुपेश फुके यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा राजेंद्र हावरे यांनी केले. कार्यक्रमास नागपूर, वर्धा, चिमूर, आष्टी, अकोला,यवतमाळ, वाशीम, व बुलढाणा जिल्ह्यातील गुरुदेवसेवा मंडळाचे भक्तगणं बंधू - भगिनी व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. प्रा गौतम सातदिवे, प्रा रमेश जाधव,प्रा निलेश गोरे, प्रा अनिता सोनुले,प्रा वैशाली कांबळे यांनी परिश्रम घेतले.
Comments