खेड (पिंपरी)गावातील शेतकऱ्याने कर्जापोटी केली आत्महत्या.
गळफास घेऊन लटकलेला मृत्तदेह आढळला.
गावात पसरली शोककळा.
उत्तम ब्राम्हणवाडे
शेतकऱ्याचे जिवन जगताना शेतकऱ्याला निसर्गाच्या बदलत्या हालचाली बँक कर्ज,प्रायव्हेट बँक लोन अनेक संकटाला तोंड द्यावे लागत असल्यामुळे त्रस्त होऊन खेड पिंपरी गावातील शेतकरी मंगेश बाबाराव तायवाडे (वय 35) यांनी आपला जीव आत्महत्या करून संपविला.
, दि,25/92023 रोजी सकाळी 6वाजता शेजारी प्रेस मागणी करीता गेले असता दरवाजा वाजऊन सुद्धा आवाज देत नाही म्हणून डोकावून पाहिल्यास गळफास घेऊन लटकलेला मृतदेह आढळला असता.
त्वरीत घटनेची माहिती सरपंच यांनी मंगरूळ पोलिस स्टेशन ठाणेदार तायडे यांना दिली,घटनेचा पंचनामा करण्यास A.S.i. मनोज सावरकर घटनास्थळी पोहचून पंचनामा चौकशी करण्यात आली.
त्या वेळी खेड पिंपरी गावातील ग्रामस्थ सरपंच मृतकाची पत्नी संजीवनी मंगेश तायवाडे ( वय 30) मुलगा सोहम मंगेश तायवाडे (वय 11) मुलगी आरुशी मंगेश तायवाडे (वय 9) मृतकाच्या परिवारामध्ये आहेत.
त्यांचा जिवनाचा आधार या घटनेमुळे संपला असून शासनाने व राजकीय नेत्यांनी शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबविण्याच्या दृष्टीने पावले उचलून हया आत्मत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला व दोन मुलांना न्याय मिळून द्यावा त्वरित शासकीय मदत जाहीर करावी अशी खेड पिंपरी गावातील सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांनी मागणी केली आहे.
Comments