औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दीक्षांत सोहळा संपन्न.

 अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण.

 दीक्षांत सोहळा थाटात पडला पार.

  उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना विविध ट्रेडमधून वेगवेगळे कौशल्ये शिकविली जातात या कौशल्याचे बळावर आय टी आय उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी देश,परदेशात सुद्धा अनेक उद्योगामध्ये कार्यरत आहेत.
आय टी आय मधून कौशल्य प्राप्त करून अखिल भारतीय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना चा यथोचित सन्मान व्हावा याकरिता या दीक्षांत सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.

याप्रसंगी संस्थेतून अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त करणारे पवन गंभीरराव,अंकिता सुने,अंजली वाघाडे, व रोहित सालोडकर या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे पालकांचे उपस्थितीत स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आय टी आय मधील सर्व ट्रेडच्या 27 गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा मंचावरून सत्कार करण्यात आला.
सदर दीक्षांत समारंभाला प्रमूख अतिथी म्हणून नांदगाव खंडेश्वर चे तहसीलदार श्री.पुरुषोत्तम भुसारी, पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता नागपुरे तसेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वर्ग 1 अधिकारी म्हणून निवड झालेले श्री तुषार ढंगारे,उद्योजक श्री अनुप खडसे हे लाभले होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नंदन भूकवाल प्राचार्य यांनी आय टी आय उत्तीर्ण होणारे गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात पाठविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले .
सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आय टी आय चे सर्व निदेशक, कर्मचारी,व आजी माजी प्रशिक्षणार्थ्यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात