प्रधानमंत्री आवास घरकूल योजना अंतर्गत भूमीहीन मंजूर घूरकूल लाभार्थीना भूखंडाचे वाटप.

मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले भूखंडाचे पट्टे.

उत्तम ब्राम्हणवाडे.

सर्वासाठी घरे - 2022 अंतर्गत प्रधानमंत्री आवास घरकूल योजना अतर्गत लाभार्थीची निवड नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती मार्फत झाली आहे. परंतु त्या लाभार्थीची गावात स्वतःची मालकीची जागा नसल्याने ते घरकूल लाभापासून वचित राहात आहेत.अशा योजने अंतर्गत मंजूर भूमीहीन घरकूल लाभार्थीना पंडीत दिनदयाल योजना, गावाठाण जमीन अतिक्रमण


नियमाकूल करने, ई / एफ-वर्ग जमीन आणि रक्तच्या नात्यातील जागा बक्षिसपत्र करने ईत्यादीच्या माध्यमातून भूमीहीन मंजूर घरकूल लाभार्थीना प्रति ५०० चौ.फूट जागा उपलब्ध करून घरकूलाचा लाभ देण्यात यावा असे शासनाचे आदेश आहेत.याच अनुषंगाने नादगांव खडेश्वर तालुक्यातील मंजूर भूमीहीन घरकूल लाभार्थिना अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा याचे हस्ते स्वः मालकी नमुना आठचे


वितरण करण्यात आले त्यामुळे लवकरच हे लाभार्थी घरकूल बाधकामास सुरवात करणार आहेत. आतापर्यत पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथील गावात खतःच्या मालकिची जागा नसलेल्या मंजूर घूरकूल लाभार्थीना पंडीत दिनदियाल योजना-११ , गावठाण अतिक्रमण नियमाकूल करने-२८४ व ई/ एफ वर्ग जमीन-४५५ आणि बक्षिसपत्र व ईतर - ९८९ असे एकूण १७३८ लाभार्थीना प्रति लाभार्थी ५०० चौ.फूट या प्रमाणे घरकूल बाधकामाकरीता जागा उपलब्ध करून दिल्याचे नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रकाश

नाटकर यांनी सांगितले. यावेळी पिंपरी निपाणी येथील सरपंच सौ योगिता रिठे यांचेसह सर्व ग्राम पंचायत सदस्य तसेच नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार पुरुषोत्तम भूसारी तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ स्वप्नील मालखेडे, गटशिक्षणाधिकारी श्रीमती शेंडे,

बालविकास अधिकारी वीरेंद्र गलपट ,पंचायत समिती विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव,श्रीमती रश्मी कुभलवार यांचेसह तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक,पंचायत समितीचे सर्व
अधिकारी,कर्मचारी, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात