बांधकाम कामगारांना मिळणारा गुड विकला जात आहे चहाच्या कॅन्टीनवर.
नांदगाव खंडेश्वर येथील प्रकार.
संतप्त नागरिकांनी केली कानउघाडणी.
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगाराना मिळणाऱ्या मध्यान्य भोजनाची थाळी ही मजुरांना काम करण्याच्या साइटवर वाटल्या जाते तेही मोफत असे असताना दररोज सायंकाळच्या वेळी ९.०० वाजता येथील बसस्थानक परिसरात गुड घेता का गुड असा प्रकार नांदगाव खंडेश्वर मध्ये चालू होता दररोज मजुरांना शासनाच्या वतीने गुड सुद्धा वाटण्यात येतो.
त्या मजुरांच्या थाळीमधील गुळ हा विक्री केल्या जातो याची कल्पनाही कामगारांना न देता नांदगाव खंडेश्वरच्या चहाच्या कॅन्टीनच्या स्टॉलवर खुलेआमपणे विकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे बांधकाम कामगारांसाठी मध्यान्य भोजनाची व्यवस्था शासनाने लावलेली आहे.
त्याचा गैरफायदा घेऊन जी गाडी हे मध्यान भोजन मजुरांना पोचविण्याचे काम करते त्या गाडीने वाटप करणाऱ्या ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या संगनमताने असा गैरप्रकार होत आलेला आहे.
जेव्हा याबाबत शहरातील काही जागृत नागरिकांनी ड्रायव्हरला विचारणा केली की हा गुळ तुला विकता येतो का ? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही गाडी इकडली नाही. या साइटवरची नाही.
असे असताना मग नांदगाव खंडेश्वरमध्ये त्या गाडीतील गुळाची विक्री कशासाठी नांदगाव खंडेश्वर मधील चहा कॅन्टीनवाल्यांनी त्याला मदत करून नांदगाव खंडेश्वरच्या बसस्टॅन्ड वरून समोर काढून दिले.
अशामध्ये ज्या बांधकाम कामगारांसाठी इतका मोठा पैसा जेवणावर खर्च होत आहे ते जेवण कामगारांना न मिळता चहाच्या स्टॉल वाले फायदा घेत आहे असे दिसून येत आहे यामध्ये बांधकाम कामगारांचे नुकसान होत आहे आयटक युनियनच्यावतीने अशी मागणी करण्यात आली आहे की, यामध्ये कसूर करणाऱ्या ड्रायव्हरवर कडक कारवाई करण्यात यावी.
नाही तर युनियनच्यावतीने तीव्र असे आंदोलन करण्यात येईल येत्या सात दिवसा मध्ये अमरावती येथील कामगार आयुक्त कार्यालयाच्या समोर कामगारांना घेऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे यामध्ये प्रभाकर शिंदे,राजू मेश्राम, पियुष शिंदे, किशोर प्रधान, मो. हारून शे. इस्लाम, इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Comments