विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला शेतकऱ्यांनी घातला घेराव.


 पापळ परिसरात कृषी पंपाची लाईन सलग तीन दिवस बंद.

शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप.

  उत्तम ब्राम्हणवाडे

  नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर विदर्भ शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यानी आणि या परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या कामाला त्रस्त होऊन कर्मचाऱ्याना घेराव घातला आणि आपला संताप व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
 येथील विद्युत सब स्टेशनच्या हद्दीत असलेल्या राजना, कोहळा (जटेश्वर) सुकळी (गुरव) आणि काजना या चार गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची लाईन गेल्या  तीन दिवसपासून बंद होती त्यामुळे शेतीची संपूर्ण कामे रखडली असून यामुळे शेतकऱ्यांचा संताप चाग्लाच वाढला एक तर निसर्ग  हा  शेतकऱ्यावर कोपला आहे आणि ज्या शेतकऱ्याकडे वीर मोटर पंप आहे ते शेतकरी पाणी  शेतीला  देतात कसंतरी आपलं पीक जगवतात आणि महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची लाईन सुरळीत चालत नाही आता शेतकरी हा पुर्णतः महावितरणच्या भरोशावर आहे.

तरीसुद्धा महावितरण हे दोन ते तीन दिवस लाईन बंद ठेवत आहेत आता शेतकऱ्यांना कराव तरी काय ?  शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी असून लाईन राहत नाही त्यामुळे पाणी देता येत नाही लाईन येते तर अर्धा घंटा चालते आणि बंद पडते महावितरणला फोन जर लावला तर सांगतात इमर्जन्सी लोड सेडीग आहे म्हणून आता शेतकऱ्यांनी मरायचं की जगायचं हा प्रश्न पडला आहे.
 पण प्रशासन शेतकऱ्याकडे काही लक्ष देत नाही आहे म्हणून सर्व शेतकरी एकत्र येऊन विदर्भ शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने  पापळ येथील महावितरणच्या सब स्टेशन वर जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि आणि आपला संताप व्यक्त केला येथील अभियंत्याला याबाबत जाब विचारला असता त्यांची चागलीच कान उघाडणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली असता त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की आज पासून कृषी पंपाची लाईन सुरळीत चालेल असे आश्वासन दिले. 

यानंतर कृषी पंपाची लाईन जर सुरळीत चालली नाही तर सर्व शेतकरी एकत्र येऊन विदर्भ शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने  पापळ येथील विद्युत सब स्टेशनवर तीव्र असे आंदोलन करण्यात येईल.गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांचे कृषी फिडर बंद असल्याने शेतकऱ्यावर घरी बसण्याची वेळ आली असून याला विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी हे जबाबदार आहेत.
छोटू मुंदे.
शेतकरी नेते, पापळ 
यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनामध्ये  प्रदीप गिरी,शिवदास इंगळे,राजू भाकरे,मनीष रोहनकर,निखिल सोनवणे,दिनेश मुंदे,दिनेश दोरक,गिरीश पंत, देविदास मांडवगडे,अनिल साखरकर, प्रमोद साखरकर,  गजानन राठोड, यांचा समावेश होता.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात