नांदगांव खंडेश्वर येथे स्वच्छता रनचे आयोजन.

गावाच्या विकासात स्वच्छतेची भूमिका महत्त्वाची.

गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर यांचे प्रतिपादन.

उत्तम ब्राम्हणवाडे

  भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रम दि. 2 ऑक्टोंबरपर्यंत पंधरवाडा स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदगांव खंडेश्वर येथे रविवार दि. 24 रोजी पंचायत समितीचे वतीने स्वच्छता रनचे आयोजन करण्यात आले.
 यामध्ये पंचायत समितीचे अधिकारी, महिला बचत गट, आशा वर्कर, शिक्षक व  विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता.
गावांच्या शाश्वत विकासामध्ये आरोग्य, शिक्षण व स्वच्छता हे महत्वाचे घटक असून स्वच्छता हि सेवा अंतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबतचे महत्व पटवून देण्यात येत आहे. 
यासाठी विविध उपक्रमही राबवित असल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर यांनी दिली. स्वच्छता रन यशस्वीतेकरीता स्वप्नील मालखेडे तालुका आरोग्य अधिकारी  
सुनिल खेडीकर, विस्तार अधिकारी, दांडगे अभियंता, रश्मी कुंभलकर, संदीप देशमुख, संदीप  गुल्हाने, दतप्रभू पुसदकर, शेख साबीर, निलेश खडसे, विजय अळणे, मनिष मदनकर, रितेश कोठेकार, पुरुषोतम  डोफे यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात