अंकुश गावंडे यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर.
शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण.
सर्वत्र होत आहे अभिनंदनाचा वर्षाव.
उत्तम ब्राम्हणवाडे
राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार दिला जातो या मध्ये प्राथमिक, माध्यमिक, आदिवासी क्षेत्र,स्त्री शिक्षिका, दिव्यांग, स्काऊट, गाईड या गटात हे पुरस्कार दिले जातात. या वर्षी 2022-23 या वर्षीचा प्राथमिक गटातील पुरस्कार हा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा दाभा येथे कार्यरत असणाऱ्या अंकुश गावंडे यांना जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार दिनांक 5 सप्टेंबर रोजी मुंबई येथे मा मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार व विधानसभा अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर यांच्या शुभ हस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला ना. दीपक केसरकर व अन्य पाहुणे उपस्थित राहणार आहेत.अंकुश गावंडे हे उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक आहेत. त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण विकास साठी प्रयत्न केला आहे.
त्यांनी वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुरु केला आहे ज्यामध्ये 50 पेक्षा जास्त देशातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी आहेत या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण जनजागृती व वृक्षरोपण व संवर्धन ची जाणीव करून दिली जाते. त्यांनी मंगरूळ चवाळा येथे कार्यरत असताना अनेक उपक्रम राबविले.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अध्ययन अध्यापन सुलभ बनविले. त्यांनी ऑगमेंटेड रियालिटी या तंत्रज्ञानावर आधारित पाठ्यपुस्तक व घटक बनविले ज्यासाठी त्यांना अंतराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्यांनी अनेक ऑनलाईन, ऑफलाईन शैक्षणिक ऍप सुद्धा बनविले आहेत. कोरोना काळात अविरत शिक्षण सुरु राहावे या करिता अनेक उपक्रम राबविले.
लोकवर्गणीतून शाळा डिजिटल कारण्याआठी प्रयत्न केले. त्यांच्या विविध उपक्रमांची दाखल घेऊन त्यांची निवड महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक विचार गट मध्ये सदस्य म्हणून व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई च्या राज्यस्तरीय गटाचा सदस्य म्हणून झाली आहे.त्यांच्या उत्कृष्ट कार्याकरिता त्यांना या पूर्वी त्यांना अनेक संस्थांचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
Comments