जिल्हा सामान्य रुग्णालयात तृतीयपंथी साठी आरोग्य मार्गदर्शन कक्ष सुरु.
_कायदे विषयक मार्गदर्शन व आभा कार्ड मार्गदर्शन संपन्न._
उत्तम ब्राह्मणवाडे
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे तृतीयापंथी समुदाया करिता आरोग्य मार्गदर्शन केंद्रा चे उदघाटन मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले सदर केंद्रा चे उदघाटन तृतीयापंथी गुरु प्रवीण यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, गुरु गुड्डी, हेमंत टोकशा, जिल्हा विधी प्राधिकरण च्या श्रीमती आडवोकेट वरुडकर, अंजली देशमुख, राजेंद्र साबळे, राजेश तुपाने किंजल रेखा पाटील ममता काजल गुरु मारिया जान पूजा तेलमोरे राशी मोगली खुशी
राजेश तूपोने प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर केंद्र हे तृतीपंथी समुदायला कुठल्याही प्रकराची अडचण न येता त्यांना आरोग्य सुविद्धा प्राप्त मिळाव्यात या करिता हे केंद्र सुरु करण्यात आले असून सदर केंद्रा मध्ये आरोग्य सेवे सोबतच इतर माहिती सुद्धा या केंद्रा मधून प्राप्त होणार आहे.
या प्रसंगी उदघाटन पर भाषणात गुरु प्रवीण यांनी सर्व तृतीपंथी समुदायला शासकीय योजणांचा लाभ घ्यावा.
तसेच आवश्यक अशे ओळख पत्रे जसे आधार कार्ड, राशन कार्ड, आभा कार्ड इत्यादी प्राप्त करून घेण्याचे आव्हाहन केले, या वेळी आपलें मनोगत व्यक्त करताना जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी तृतीयपंथी यांना समाजाने आता दूर न लोटता जवळ करावे आणि समुदाया बाबत असलेले गैरसमज समज दूर करावे कारण आता तृतीपंथी समुदाय आता फक्त मागणारच नाही राहिला तर सामाजिक कार्य मध्ये आता हा समुदाय पुढाकार घेत आहे असे सांगितले.
या प्रसंगी उपस्थित तृतीपंथी समुदाय तसेच एच आई व्ही संक्रमित व्यक्ती तसेच जोखीम गटातील महिला व पुरुष यांना जिल्हा विधी प्राधिकरण तर्फे कायदे विषयक मार्गदर्शन आडवोकेट वरुडकर मॅडम यांनी केले आणि एच आई व्ही कायदा 2017 च्या प्रचार आणि प्रसार होण्या च्या दृष्टिकोनातून एका विशेष मोहिमेची सुरवात येते काही दिवसात जिल्हा विधी प्राधिकरण करेल असे सांगितले. या प्रसंगी बोलताना हेमंत टोकशा यांनी सर्वांनी औशोधापाचार नियमित घ्यावा जेणे करून प्रत्येकाची प्रतिकार शक्ती वाढेल असे सांगितले.
या प्रसंगी मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी, अति जोखीम गटातील स्त्रीया, एच आई व्ही संक्रमित व्यक्ती यांचे आभा कार्ड ची नोंदणी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे संचालन श्याम वहाणे समुपदेशक यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री लोकेश पवार यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी करण्या साठी आरती इंगळे, नीता गोगटे, अजय वरठे, प्रमोद कळसकर, नरेश मंथपूरवार, जयश्री नागपुरे,अतुल गुहे कृष्णा नागले आदित्य पिंजरकर प्रेमराज गुंजाळ गौरव ढवळे धीरज तायडे,
अक्षय गोहाड, अमित बेलसरे इत्यादी यांनी परिश्रम घेतले.
Comments