नांदगाव खंडेश्वर येथे पी एम रन फॉर स्किल स्पर्धा संपन्न.

नांदगाव खंडेश्वर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आयोजन.

उत्तम ब्राम्हणवाडे

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासनाचे मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव खंडेश्वर चे विद्यमाने आज नांदगाव खंडेश्वर येथे पी एम रन फॉर स्किल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सकाळी 7 ते 8 या वेळेत करण्यात आले होते या स्पर्धेत जवळपास 225 विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेचा शुभारंभ राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक श्री. सदानंद जाधव व संस्थेचे प्राचार्य श्री नंदन भूकवाल यांनी हिरवी झेंडी दाखवून केला या स्पर्धेत पुरुष व महिला गटातील विजेत्यांना रुपये बारा हजाराची रोख पारितोषिके होती.
आय टी आयच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील युवक व युवती करिता कौशल्य विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात या सर्व योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी या करिता या मॅरेथॉन स्पेर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धेत पुरुष गटात 3 व महिला गटात 3 पुरस्कार विजेत्यांना प्रदान करण्यात आले .
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या सर्व निदेशक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
सदर स्पर्धेसाठी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व एकलव्य क्रीडा अकादमी चे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात