जि.प केंद्रशाळा मांजरी म्हसला येथे पाककृती स्पर्धा संपन्न.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून होत आहे साजरे.

उत्तम ब्राम्हणवाडे

 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून आपण साजरे करत आहोत. त्या अनुषंगाने देशामध्ये सप्टेबर महिना पोषनमाह म्हणून साजरा करण्यात येत आहे. आपल्या राज्यांमधे त्यानिमित्त विविध स्तरावर पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मांजरी म्हसला केंद्रास्तरिय पाककृती स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. त्यामधे सौ.कविता शरद रुमने,  तैमूरनिसा शेख इनायत ऊल्ला आणि  सौ. हेमलता सचिन गोमासे यांचे पाककृतीला अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमाक मिळाला. त्यांना पुढील तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविता येईल.
     या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी 
प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेच्या अधीक्षक सौ. कल्पणाताई वानखडे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शरद रुमने अध्यक्ष शाळा व्य.समिती मांजरी म्ह., सचिन गोमासे, आहारतज्ञ वैशाली दहिकर आणि केंद्रातील सर्व मुख्याद्यापक दिपीका अर्बाळ, सूरज मंडे, जितेंद्र यावले, सजय नेवारे, मनोज भांदर्गे, शिवहरी मुघल, गजानन वाके, प्रामुख्याने उपस्थित होते. 
       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा गिरी यांनी केले तर प्रास्तविक दिपिका अर्बाळ यांनी आणि आभार प्रदर्शन अशोक बेरड यांनी पार पडले.

      बदलत्या जीवनशैलीत जंकफूड खाण्याच्या प्रवृत्तीमुळे आपल्या आहारातून पौष्टिक पदार्थ चा वापर कमी होत चालला आहे. वास्तविकता पौष्टिक तृणधान्याचा उपयोग आपल्या रोजच्या ऊर्जेच्या गरजा भागण्याकरता होणे आवश्यक आहे. आपला आहार कर्बोदके प्रथिने, जीवनसत्वे युक्त समृद्ध असणे आवश्यक आहे. सदर गरज तृणधान्य व कडधान्य मधून भागविणे शक्य आहे.  विद्यार्थांना शालेय जीवनातच तृणधान्य युक्त आहाराची सवय लागणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन कल्पना वानखेडे यांनी केले. याप्रसंगी जितेंद्र यावले यांनी पौष्टीक आहार विषयी आपले विचार व्यक्त केले.  निरीक्षक वैशाली दहिकर आहारतज्ञ आणि पाहूण्यांनी स्पर्धेतील पाककृतींचे निरीक्षण केले व चव घेऊनी अभिप्राय दिले.

  तालुकास्तरीय पाककृतिकरिता प्रथम बक्षीस ५००० रूपये द्वितीय बक्षीस ३५०० तर तृतीय बक्षीस २५०० रुपये देण्यात येणार आहे. उत्कृष्ट पाककृतीची निवड खालील निकशाच्या आधारे करण्यात आली. तृणधान्यातील पौष्टिकता, दैनिक आहारामधील उपयोग, तृणधान्याचा आरोग्य विषयक लाभ, तृणधान्याची चव मांडणी व नाविन्यपूर्नतः, पाककृती बनवण्याची कृती सुलभता व इंधन बचत, या निकषावर गुणदान करण्यात येते.
या कार्यक्रमाचे यशवतेकरिता दिपिका अर्बाळ अशोक बेरड,उज्ज्वला भडांगे, सुषमा गिरी, रेखा बोकडे, प्रेरणा पेठे, शेख भाऊ, सुनिता जाधव, उषा चोरमांगे, मिरा गोमासे, राहुल आकोडे, आशिष गाडे इत्यादींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात