४३ रक्तदात्यांनी रक्तदान करून दिली शहीद पंजाब उईकेला श्रद्धांजली.
४३ रक्तदात्यांनी रक्तदान करून दिली शहीद पंजाब उईकेला श्रद्धांजली.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर येथील वीर सुपुत्र स्वर्गीय पंजाब जानरावजी हे उईके हे १८ सप्टेंबर २०१६ रोजी उरी कश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. शहीद पंजाबच्या देशरक्षणाच्या कार्याला प्रेरित होऊन त्यांच्या मित्रांनी संघर्ष युवा संघटन नावाची एक सामाजिक संस्था निर्माण केली व त्या संस्थेच्या माध्यमातून गेल्या सात वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्यात येत. संघर्ष युवा संघटनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शहीद पंजाब उईके
यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या वतीने दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी बस स्टॅन्ड जवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम विरमाता बेबीताई जानरावजी उईके यांनी शहीद पंजाब उईकेच्या प्रतिमेचे पूजन केले व रक्तदान शिबिराला सुरवात झाली. या रक्तदान शिबिरामध्ये ४३ रक्तदात्यांनी रक्तदान करून शहीद पंजाब उईकेला श्रद्धांजली अर्पण केली व देशभक्तीचा परिचय दिला.
या रक्तदात्यांचा सन्मान संघर्षच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन दि. २१ सप्टेंबर २०२३ रोजीच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या शिबिराला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती रक्तपेढीची चमू उपस्थित होती.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वीकरिता संघर्ष युवा संघटनच दिनेश शेळके, आशिष खंडार, सुनील सूर्यवंशी, मंगेश देवळे, नंदू भोसले, निखिल भेंडे, आशिष मारोटकर, वैभव कोंडवते, जय पेंदाम, महेश नागपुरे, स्वप्निल सोनवणे, प्रीतम देशमुख, सुधाकर कोंडवते, भीमरावजी इंगोले, संचित इंगोले, प्रशांत हुकरे, रुपेश भोयर इत्यादींनी परिश्रम घेतले.
Comments