मराठा समाजाच्या आवाहनानंतर नांदगाव खंडेश्वर शहर कडकडीत बंद.
जालना येथील अत्याचाराचा केला निषेध.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी.
उत्तम ब्राम्हणवाडे
जालना येथील पोलीस अत्याचाराच्या निषेधार्थ आज (दि.4 रोजी) नांदगाव खंडेश्वर शहर बंदचे आयोजन सकल मराठा कुणबी समाजाच्या वतीने करण्यात आले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाकरिता उपोषण करून आंदोलन केले जात होते.
अतिशय शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनकर्त्यांवर अमाणूष लाठीचार्ज व गोळीबार करण्यात आला.स्त्रिया,वृद्ध, आणि लहान मुलांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज नांदगाव खंडेश्वर शहर बंदचे आयोजन सकल मराठा कुणबी समाजाच्या वतीने करण्यात आले.
यावेळी शहरातील बाजारपेठ ही सकाळ पासूनच बंद
ठेवण्यात आली होती. या बंद दरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
संत गजानन महाराज मंदिरातून निघालेल्या निषेध मोर्चा तहसील कार्यालयात जाऊन तिथे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना मराठा समाजाच्या शिस्टमंडळाने निवेदन सादर केले. त्यानंतर सर्व मोर्चेकऱ्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले.
या मोर्चामध्ये बाळासाहेब अमोल धवसे राणे,डॉ.प्रमोद कठाले,डॉ.नितीन टाले,प्रमोद कोहळे, सूर्यपाल चव्हाण,चतुर डांगे, गजानन काजे,निलेश मुधोळकर,दिनेश धवस,आशिष चव्हाळे,मोहन जाधव,पंकज पवार,बाळासाहेब रोहनेकर, प्रशांत देशमुख,राजेश जाधव,शुभम जाधव,
विष्णू तिरमारे,दिलीप देवतळे, विलास सावदे,रमेश ठाकरे,प्रशांत धवस,रवींद्र पाटील,योगेश ताठोड,राजू पवार,मनोहर सावत,प्रशांत सावत,संतोष पाटील,बंडू देशमुख यांचेसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Comments