येणस येथील मजूर महिलेचा अंगावर विज पडून मृत्यू.

गावात पसरली शोककळा.

कौशल्या ज्ञानेश्वर लेंडे असे मृतक महिलेचे नाव

उत्तम ब्राम्हणवाडे 

 नांदगाव खंडेश्वर तालुक्यातिल् येणस  येथील महिला कौसल्या ज्ञानेश्वरराव लेंडे ह्या  २८/९/२०२३ रोजी नेहमी प्रमाणे घरच्या शेतात काम करण्यास गेल्या असता दुपारी २:३०ते ३:०० च्या दरम्यान विजेच्या कळकळाहट सह पावसाला सुरवात झाली.
खूप वेळ झाला आई घरी परत न् आल्यामुळे सायंकाळी ६:३० च्या दरम्यान मुलगा मंगेश लेंडे शेतात पाहण्यासाठी गेला असता काहीवेळ शेतात शोध घेतल्या नंतर त्याचे लक्ष हिवराच्या झाडाकडे गेले व तिथे त्या मृत अवस्थेत पडून होत्या. त्यांचे शेत चांदूर रेल्वे तालुक्यात टोणगलाबाद शिवारात येत असल्यामुळे टोणगलाबाद येथील पोलीस पाटील उमेश निस्ताने यांना माहिती दिली. व ते लगेच घटना स्थळी पोहचले.

 त्यांनी लगेच नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला कळवले. माहिती मिळताच नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन चे   PSI अमोल तेंजुलवार साहेब आपल्या ताफ्या सह  घटना थळी पोहचले.
व घडलेल्या घटनेचा पंचनामा करून सायंकाळी १० च्या दरम्यान प्रेत ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडे येथे पोस्ट मॉर्डम ला पाठवण्यात आले.  

पाऊसापासून बचाव व्हावा म्हणून त्या हिवराच्या झाडाखाली बसल्या असव्यात् व काही  क्षणात विज कोसळून मृत्यु मुखी पडल्या  असे निर्देशनात आले.पुढील तपास नांदगाव खंडेश्वर ठाण्याचे PSI अमोल तेंजुलवार साहेब करित आहे.   या वेळी घटनास्थळी  उमेश निस्ताने (पोलीस पाटील टोणगलाबाद) योगेश फुके (पोलीस पाटील येणस) व गावातील नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात