पिंपरी निपाणी येथे माझी माती माझा देश अंतर्गत अमृत कलश यात्रा.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा पांडा यांची उपस्थिती.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आदर्श ग्राम पिंपरी निपाणी येथे माजी माती माझा देश अंतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती अविशात पांडा यांचे स्वागत सरपंच योगिता विशाल रिठे, यांनी वृक्ष देऊन केले त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातर्फे सर्वांसाठी घरे अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांनी इ वर्ग जमीन मधून नमुना आठ वाटप लाभार्थ्यांना करण्यात आला.
त्याचबरोबर पोषण आहार अभियान अंतर्गत गरोदर स्तनदा माता यांना पोषण आहार किट व फळे वाटप करण्यात आले, पोषण आहार अभियान अंतर्गत मात्र बापासाठी काहीतरी गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले . त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीसला गॅस किट देण्यात आली, त्यानंतर वीर शहिदांना श्रद्धांजली म्हणून पंचपान शपथ घेण्यात आली यावेळेस सरपंच योगिता विशाल रिठे या संबोधतांनी बोलल्या की.
एकत्र येणे ही सुरुवात एकमेकांसोबत राहावे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे यश याच ब्रीदवाक्यावर ग्रामपंचायत पिंपरी निपाणी सर्वस्वी स्वीकार करीत आहे व काम करीत आहे, त्यामुळेच आज गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार, विभाग स्तरीय दुतीय पुरस्कार,आर,आर आबा ,परील सूंदर गावयोजना अंतर्गत तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार, तंटामुक्त ग्राम पुरस्कार ,इत्यादी पुरस्कार , आपल्याला लोकसभागामुळेच मिळू शकले, यानंतर गावात अमृत कलश यात्रा काढण्यात आली.
व प्रत्येक घरा जवळ कलशाचे पूजन करून माती जमा करण्यात आली, यावेळी प्रमुख ख्याने गावातील महिलांची दिंडी ,पुरुषांची दिंडी ,लेझीम पथक ,ढोल ताशे पथक ,छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा धारण करून घोड्यावर त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर गावातील लोकांनी संत गाडगेबाबा, वीर जवान ,अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, माता जिजाबाई, भारत माता ,भगतसिंग , शेतकरी,इत्यादी वेशभूषा धारण केले होते.
त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्व महापुरुषांच्या अतिशय सुंदर अशा वेशभूषा धारण करून गावातून रथामध्ये मिरवणूक काढली, यावेळेस प्रामुख्याने उपस्थित जिल्हा परिषद मधील सीईओ अविषांत पांडा साहेब,तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर, विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी स्वप्निल मालखेडे साहेब ,वैद्यकीय अधिकारी पापड लांडगे ,मग्रारोहयो विभाग ,घरकुल विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर,उपस्थित होते, पिंपरी निपाणी येथील सरपंच योगिता विशाल रिठे, उपसरपंच पुष्पा राजू प्रगने, ग्रामपंचायत सदस्य दीपिका किशोर रिठे, सुजाता प्रदीप डोंगरे, पुष्पा रमेश रिठे, गणेश उखंडराव धामणे, प्रतीक ज्ञानेश्वर रिठे ,
ग्रामसेवक विक्रम पिसे ,सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील रिठे, गणेश पाटील रिठे,तंटामुक्ती अध्यक्ष शम्मी पठाण ,पोलीस पाटील संदीप डोंगरे ,रोजगार सेवक सचिन रिठे,स्वच्छता ग्राही चेतन रिठे, मंगेश कांबळे सरपंच खेळ, नवले साहेब ,बरदिवे , किठे साहेब ,आरोग्य सेवक सुनिल तेलनगरे, तलाठी थोरात, कोतवाल आशिष ढोमने , जिल्हा परिषद शाळेमधील मुख्याध्यापक बोनडे सर ,पवार सर, व शिक्षक वृंद ,विद्यार्थी ,गावातील महिला मंडळी व गावकरी इत्यादी हजर होते.
Comments