माहुली चोर येथे युवकांच्या सतर्कते मुळे दुर्घटना टळली.
बाजारातील पोलमध्ये होता विद्युत प्रवाह.
युवकांच्या समयसूचकतेमुळे वाचले प्राण.
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर येथे दि.5 रोजी रात्री 10:30 वाजता आठवडी बाजार परिसरातील विद्युत खांबांत अचानक विद्युत प्रवाह संचारीत झाला. हि बाब तिथे उभे असलेल्या युवकांच्या लक्षात आली.
त्यांनी लगेच विद्युत कर्मचार्याशी संपर्क साधून खांबावरील विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली दि.5 सप्टेंबर रोजी
रात्री 10:30 वाजता येथील आकाश अंबर्ते, विष्णू तिखीले,शिवा दरणे, चेतन दाते हे युवक आठवडी बाजार परिसरात उभे असतांना तेथील विद्युत खांबा जवळील पाण्याच्या डबक्यात डुक्कर गेलाअसता तो जोरात ओरडला.
व लगेच मेला. त्यामुळे खांबात विद्युत प्रवाह असेल्याचे युवकांच्या लक्षात आले. व त्यांनी विद्युत कर्मचार्याशी संपर्क साधून सदर खांबावरील विद्युत पुरवठा खंडीत केला.
Comments