महिला गटाचा आर्थिक व सामाजिक दर्जा उंचविणार :- प्रकाश नाटकर.
वाढोणा रामनाथ येथे महिला बचत गटाच्या उत्पादीत वस्तूंना उपलब्ध करून दिली बाजरपेठ.
उत्तम ब्राम्हणवाडे
उमेद अंतर्गत महिला बचत गटाने उत्पादीत केलेल्या वस्तूनां बाजार पेठ उपलब्ध करून वस्तूना योग्य भाव मिळवा आणि बचत गटामध्ये व्यापाराचे कौशल्य वृद्धीगंत व्हावे.
या माध्यमातून बचत गटांचे आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन सामाजीक दर्जा सुधारणास मदत व्हावी या उद्देशाने गटविकास अधिकारी यांच्या संकल्पनेतून वाढोणा रामनाथ पंचायत समिती नांदगांव खंडेश्वर येथे
पोळा सणाचे निमित्त साधुन आठवडी बाजारामध्ये परिसरातील महिला बचत गटाने उत्पादीत केलेला वेगवेगळ्या वस्तूचे स्टॉल लावण्यात आलेले होते.
याला ग्राहकांकडुन सुद्धा उत्तम मिळत असल्याचे महिला बचत गटातील सदस्याने सागितले. ग्राहकाचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने तालुक्यातील इतर ठिकाणी भरत आठवडी बाजारामध्ये स्टॉल लावण्या करिता
जागा उपलब्ध करून देण्याबाबत ग्राम पंचायत यां ना देण्यात निर्देश देण्यात आले आहे असे प्रकाश नाटकर गट विकास अधिकारी यांनी सांगितले.
यावेळी प्रकाश नाटकर गटविकास अधिकारी; विठ्ठल जाधव विस्तार पंचायत; सौ. सविता तिरमारे सरपंच, राजेंद्र वाकोडे ग्राम विकास अधिकारी, श्रीमती रश्मी कुभलकर उमेद व ग्राम ग्राम पंचायत सदस्य वं कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
Comments