बंजारा तीज महोत्सव थाटात संपन्न.


महंत बाबुसींगजी महाराज  यांच्या प्रमुख तीज विसर्जन.

हजारो बंजारा समाज बांधवांची उपस्थिती.

उत्तम ब्राम्हणवाडे

 अमरावती येथील किरण नगर येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटी मध्ये अमरावती महानगर तांडाचे नायक प्रल्हाद चव्हाण यांच्या नायकी मध्ये उपअभियंता विजय राठोड ( आसामी ) यांच्या निवासस्थानी 30 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा निमित्त तिज उत्सवाची सुरवात झाली होती.

बंजारा समाजामध्ये सण उत्सवाला मह्त्व असतात. श्रावण महिना लागला की रानमाळात काम करणार्‍या मुली तीज उत्सवाच्या आगमनात विविध लोकगीत गाऊ लागतात. आज नोकरी, उद्योगधंद्याच्या निमित्ताने शहरामध्ये स्थाई झालेला बंजारा समाज आपल्या संस्कृतीचे संवर्धन करीत अमरावती महानगरांमध्ये मागील तेवीस वर्षापासून एम. एच. राठोड ( सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी) यांच्या नेतृत्वात तीज उत्सव साजरा करीत आहेत. सर्वप्रथम तांडाचे नायक, कारभारी, आसामी, सर्व जेष्ठ नागरिक व समाजातील महिलांच्या उपस्थितीत सुनील जाधव ( कार्यकारी अभियंता ) यांच्या हस्ते सेवादास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून तीज रोपणाला सुरवात करण्यात आली. 

त्यानंतर समाजातील महिला व तरुणी आपल्या पारंपरिक नृत्याला सुरवात करीत गीत गाऊ लागले. 9 सप्टेंबर रोजी ढंबोळी म्हणजे तीजला नेवैद्य दाखवून महंत बाबुसींगजी महाराज यांच्या अमृतवाणी ने  10 सप्टेंबर रोजी मनोहर मांगल्य मंगल कार्यालयांमध्ये तिज विसर्जनाचा कार्यक्रम हजारो बंजारा समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला.  

ह्या कार्यक्रमादरम्यान महंत बाबुसींगजी महाराज यांची स्थानिक दस्तूर नगर चौक ते कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत भव्य दिव्य अशी रथ यात्रा काढण्यात आली. बंजारा समाजातील महिला आपल्या संस्कृतीचे लोकगीत तसेच नृत्य सादर करून कार्यक्रमाला सुरवात झाली.

 यावेळी निता राठोड, संगीता चव्हाण अनु चव्हाण, सविता राठोड, एम एच राठोड, सुनील जाधव, प्रल्हाद जाधव, नामदेव जाधव, विजय राठोड, 

किसन राठोड, गोपीचंद चव्हाण, श्रावण जाधव, के. डी. चव्हाण, मोहन जाधव, परसराम राठोड, रमेश राठोड, अजय जाधव, हरिश्चंद्र राठोड, कमल पवार, दिगंबर राठोड, सुधाकर जाधव, हरीश राठोड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात