सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांच समाजकार्य.
आध्यात्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्य सुद्धा सुरू.
संपूर्ण वर्षभर साजरी होतात सामाजिक कार्यक्रम.
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर येथील युवकांनी मागील वर्षी पासून माहुलीचा राजा गणेश मंडळ स्थापन केले असून त्या मध्यमातून आध्यात्मिक कार्या सोबतच सामाजिक कार्य करीत आहे.
माहूली चोर येथील सर्व तरुणांनी एकत्र येवून मागील वर्षी माहुलीचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली.
या मंडळाव्दारे येथील पुंडलिक महाराज मंदिराचे जागेत गणेशमुर्तीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाकडून गणेशोत्सवाला केवळ आध्यात्मिक दृष्टीने न पाहता तसेच केवळ दहा दिवसच मंडळाने काम न करता पूर्ण वर्षभर मंडळाच्या मध्यमातून समाजकार्य करण्यावर मंडळाचा भर असतो.
मागील वर्षी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर,ग्रामस्वच्छता या सारखे कार्यक्रम राबविण्यात आलेत.तसेच गावातील गरीब गरजूंना व्यक्तीला आरोग्याविषयी आर्थिक मदतीची गरज आल्यास मंडळाचे कार्यकर्ते सर्विकडून वर्गणी जमा करून गरजू व्यक्तीला मदत करतात.या वर्षीच्या गणेशोत्सवात दहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
असून या मध्ये ह.भ.प.शिवाजी महाराज मानकर, अक्षय महाराज चंदेल यांचे हरिकीर्तन,ह.भ.प.संतोष महाराज भालेराव यांचे भारुड,रुपरावजी गाडेकर यांचा मनोरंजनातून प्रबोधन,वृक्षरोपण, शिवकालीन ऐतीहासिक शास्त्र माहिती, संकृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबीर, भजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
माहुलीचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गावातील युवकांच संगठन पाहायला मिळत असून सर्व गावकरी मंडळाला मदत करीत आहे.
Comments