पावसाचा खंड पडलेल्या मंडलातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या.
कृषी विभागाने केलेला चुकीचा सर्व्हे रद्द करा.
अन्नत्याग करणार असल्याचा शेतकरी नेते छोटू मुंदे यांचा इशारा.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चार महसुली मंडळामध्ये सन 2023 मधील हंगामातील पावसाच्या संदर्भात नुकसानग्रस्त महसूल मंडळाचे सर्वेक्षण करून तात्काळ मदत देण्याचे विमा कंपनीला आदेश देण्यात यावे अशी मागणी विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंदे यांनी जिल्हाधिकारी अमरावती,उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे, तहसीलदार नांदगाव खंडेश्वर तसेच तालुका कृषी अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे आणि चांदुर रेल्वे तालुक्यातील काही महसूल मंडळामध्ये मागील ऑगस्ट 2023 मध्ये सलंग 25 ते 27 दिवस पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनचे पीक करपून गेले आहे तरी काही ठिकाणी विषाणूजन्य रोगाने पीक ग्रस्त झाले आहे अशा
Comments