शाहू महाराज विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात.
उत्तम ब्राम्हणवाडे
अमरावती द्वारा संचालित शाहू महाराज विद्यालय व श्री वसंतदादा पाटील कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अनिल गवई प्रा.वैशाली रहाटे माधव कानबाले विनोद इंगळे विकास फसाटे प्रदीप नितनवरे रूपाली विचे प्रा.मोहिनी माकोडे मोनू सरदार अभिनंदन गवई इत्यादी उपस्तीत होते तसेच विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश पवार म्हणाले की डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण एक आदर्श शिक्षक होते त्यांनी अविरत शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र काम करताना एक सुसंस्कारित पिढी घडविण्याचे काम केले.मूल्यधारीत शिक्षण देऊन सामाजिक स्तर उंचावण्याच्या कामे त्यांचे योगदान अतुलनीय आहे.त्यांच्या याच कार्याचा सन्मान म्हणून व शिक्षकांप्रती असलेले प्रेम पाहून त्यांचा हा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे भारत सरकारने ठरविले.
यावेळी प्रारंभीर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन सावित्रीबाई फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे अतिथिनच्या हस्ते व विद्यार्थी शिक्षकांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी प्रा.अनिल गवई प्रदीप नितनवरे व विद्यार्थी शिक्षक वृषदा आक्रम जानवी साबळे सुबोध जोगे वेदांत कांनबाले पार्थ कानबाले सुमित नेवारे आर्या मेसराम अंशू मेश्राम योगिता ठाकरे अनुष्का परसवाई अनश अलतमाश अक्षरा नेवारे दर्शना गायकवाड संस्कार ढोले राधिका मुधोळकर यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवनावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थी स्वयंशासित शाळा घेण्यात आली.
दिवसभरातील शाळेचे संपूर्ण कामकाज विद्यार्थ्यांनी शिस्तीत सांभाळून इतर विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालकन शिक्षक विद्यार्थिनी कु.माही बगळे तर आभार प्रदर्शन गार्गी मुधोळकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता गोरखनाथ पर्वतकर उमेश विलातकर गजानन भोंगरे शुभम इंझलकर सविता नेवारे सुरेखाताई इंगळकर तसेच विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.f
Comments