नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करणारा कर्मचारीच नाही.
खाजगी व्यक्ती बोलावून करावे लागते शव विच्छेदन.
खाजगी व्यक्ती शवविच्छेदन करण्यासाठी मागतो २,००० रुपये.
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे आजू बाजूच्या सर्व खेड्यावरून दररोज हजारो गरजू नागरिक हे ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे उपचाराकरिता येत असतात. अश्यातच एखादा अपघात घडला आणि त्यामध्ये एखादा व्यक्ती जर मरण पावला तर त्याच्या शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात यावे लागते.मात्र येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छदन करणारा व्यक्तीच नसल्याने मृत्काच्या नातेवाइकांना नाइलाजाने खाजगी व्यक्तीला २००० हजार रुपये देऊन बोलवावे लागते कधी हा व्यक्ती हजर असतो तर कधी नाही आणि आला तर अती प्रेमात दारू पिऊन असतो आणि मग तो जास्तीचे पैसे दिल्याशिवाय मृतकाचे शवविच्छेदन करीत नाही.
त्यामुळे मृतकाचे नातेवाइकांना नाहकचा त्रास सहन करावा लागतो आणि नाइलाजाने जास्तीचे पैसे मोजावे लागतात कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्यायच नसतो. त्यामुळे या महत्वपूर्ण विषयाकडे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी लक्ष देण्याची मागणी.
त्रस्त नागरिकांनी केली आहे. त्याच प्रमाणे या शव विच्छेदन कक्षा बाहेर व आजू बाजूच्या परिसरातील मोठ्या प्रमाणात घाणीमुळे शवविच्छदन करण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांचे मात्र आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे . याकडे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कोणतेही लक्ष दिसून येत नाही.
त्यामुळे शवविच्छेदन करण्यासाठी जाणाऱ्यांना येथे जाण्यास रस्ताच दिसून येत नाही. डॉक्टरांच्या कक्षात जाण्याकरिता असलेल्या रसत्यात खूप मोठया प्रमाणात गांजरगवत वाढलेले असल्याने सरपटणारे प्राणी हे पेशंटच्या कक्षात शिरून त्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथून ये जा करित असतांना मात्र रुग्णांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे . याकडे सबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी हेतू परस्पर दुर्लक्ष करीत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळताना दिसत आहे. या ठिकाणी शव विच्छेदन करण्यासाठी शासनाचा कोणताही कर्मचारी नसल्याने त्वरित येथे शाकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
ग्रामीण रुग्णालयात सध्या दोन स्वीपर आहेत पण ते शवविच्छेदन करण्यासाठी योग्य नाहीत त्यामुळे मी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडे सक्षम युनिट मधून येथे आणखी काही स्विपर देण्याची मागणी केली आहे ते उपलब्ध झाल्यास त्यामधील एक व्यकी शव विच्छेदन प्रशिक्षणा करिता पाठविता येईल सध्या आमचा याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
डॉ.अजयकुमार नाथक
वैद्यकीय अधीक्षक,ग्रामीण रुग्णालय,ना.ख.
Comments