सहारा,रब्बानी,न्यू मराठाने उडविली एकता,रॉकेट,साई सरकारची दाणादाण.

पूर्व  उपांत्य साठी जगदंब ,राहूबाबा, छत्रपती ची एकाकी झुंज.

आमदार चषक रस्सीखेच स्पर्धा.

उत्तम ब्राह्मणवाडे
सहारा, रब्बानी, न्यू मराठा या संघाने एकता,रॉकेट, साई सरकार ची दाणादाण उडविली तर जगदंब ,राहूबाबा, छत्रपती सह अठरा संघाची पूर्व उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी उशिरा रात्रीपर्यंत एकाकी झुंज सुरू होती
अरुणभाऊ अडसड बहुउद्देशीय संस्था, स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था ,भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने आमदार प्रतापदादा अडसड चषक रस्सीखेच स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पंजाबराव देशमुख स्पोर्ट क्लब वर नवयुवक विरुद्ध गाडगेबाबा संघ असा पहिला सलामीचा  सामना झाला.
 यात  गाडगेबाबा संघाला पराभव पत्करावा लागला तर पहिल्या फेरीत  वीर भवानी, गजानन महाराज, छत्रपती नवदुर्गा, न्यू मराठा ताज इंडिया राहू बाबा बजरंग भाई, तात्या, शिवशक्ती, सहारा रब्बानी माऊलीचा राजा जगदंब, श्रीराम या संघाने  रस्सी ओढत मैदान गाजविले पूर्व तात्या विरुद्ध जय बजरंग, नवयुवक विरुद्ध श्रीराम  बजरंगी भाईजान विरुद्ध वीर भवानी तसेच  रब्बानी,साई सरकार, माहुलीचा राजा, न्यू ताज सहारा, न्यू मराठा या संघाची दुसऱ्या फेरीत एकाकी झुंज सुरू होती.

रस्सीखेच मधून सशक्त पिढी निर्माण करा - आ प्रतापदादा अडसड
मैदानी खेळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मतदार संघात रस्सीखेच स्पर्धेला  मैदान व दोरखंड उपलब्ध करून देण्यात येईल खेळाच्या माध्यमातून उद्याची सशक्त पिढी घडण्यासाठी गावागावातील युवकांनी मैदानी खेळासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आ प्रताप अडसड यांनी केले यावेळी निकेत ठाकरे अर्चना रोठे  राजेश पाठक हरिचंद्र पाटील खंडाळकर रवींद्र मुंदे घनश्याम सारडा वसंत सावंत दीपक  तिखीले अजय निर्मळ उद्धव पारवे अनिल झंजाळ अजगर पठाण शहराध्यक्ष नवल खिची अरुण  गुल्हाने पांडुरंग काकडे मनीष जाधव दीपक  लोणकर अनंत चौधरी पंकज मेटे 
महिला जिल्हाध्यक्ष अनितातिखीले सुरेखाशिंदे सुधाकर डोंगरे अमोल मारोटकर अरुण लाहबर मोनाली बाभुळकर वर्षा काळे आशा पाटील  निखिल मोरे रुद्रेश शिंदे कल्पना गभणे भगत  अक्षय मस्के अंकुश निमनेकर ज्ञानेश्वर गव्हाणे विलास जाधव प्रफुल मानके गणेश पाटोळे अमोल गुल्हाणे मगेश मानके अंकुश खांडेकर धनंजय भडके सुधीर भडके सुमित निर्मळ सरपंच विशाल मेश्राम बाबा भाई यांची उपस्थिती होती.

१४ संघाचा अंतिम फेरी साठीसराव सुरू

तीन तालुक्यातून दोन फेरीत विजयी झालेले संघ गावाच्या मैदानावर युद्ध स्तरावर सराव सुरू केला आहे  १२ ऑक्टोबर रोजी पूर्व उपांत्य व अंतिम फेरी  धामणगाव येथील मिश्रिकोटकर मैदानावर होणार आहे येथे तब्बल २१  संघ एकमेकांसमोर येणार आहे पंच म्हणून अशपाक सर वैभव देशमुख ,हर्षद मालधुरे वसंत तिजारे यांनी कामकाज पाहिले.

Comments

Anonymous said…
Good👍

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात