एस.एफ.आयचे शासनाचे विरोधात धिक्कार आंदोलन.
शासन निर्णय मागे घेण्याची केली मागणी.
उत्तम ब्राह्मणवाडे
महाराष्ट्र सरकारने खाजगी कंपन्या द्वारे भरती करण्याचा निर्णय विरोधात विद्यार्थ्यांनी शिंगाडे विकून केला शासनाच्या खाजगीकरणाचा तीव्र निषेध .नांदगाव खंडेश्वर येथील एम.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समिती तर्फे बस स्टॉप परिसर मध्ये धिक्कार आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय पदे ही कंत्राटी तत्त्वावर भरण्याचे अध्यादेश काढले आहे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद शाळा सुद्धा शासनाने खाजगी कंपन्यांना चालवण्यास देण्यात येणार आहे.
आणि महाराष्ट्रातील सरकारी दवाखाने हे सुद्धा महाराष्ट्र सरकार मोठ्या कंपन्यांना चालवण्या करिता देणार आहे. सगळीकडून गरिबांचा श्रमिकांचा मायबाप कष्टकरी शेतकऱ्यांचा आणि आणि तमाम विद्यार्थ्यांचा छळ महाराष्ट्र शासन करत आहे.
म्हणून सर्व विद्यार्थी एकत्र येत धिक्कार आंदोलन यावेळी करण्यात आले. आंदोलनातील प्रमुख मागण्या कंत्राटी पद्धतीने शासकीय पदभरती करणाऱ्या अध्यादेश त्वरित मागे घ्या, विविध विभागातील सहा लाखाहून अधिक रिक्त असलेले सर्व पदे तातडीने भरण्यात यावे,
६२,००० हजार जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण त्वरित थाबवावे आणि सरकारी दवाखाने यांचे खाजगीकरण त्वरित बंद करावे, शासनातील सर्व पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात यावी. मागण्याचे निवेदन पुरुषोत्तम भुसारी यांचे मार्फत मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना देण्यात आले.
यावेळी पत्रकार शाम शिंदे, सूरज अंभोरे, दिपाली ढोके, राहुल हजारे, विशाल शिंदे यांनी शासनाच्या निर्णया विरुद्ध आपले मत व्यक्त केले, ऋषिकेश मारोटकर, अमर भगत, सागर भाटूरकर, किशोर देवतळे, अजिंक्य धोके, गौरव बनसोड, प्रणव मारोटकर, स्वपनील रावेकर आणि प्रफुल पवार उपस्थित होते.
Comments