माऊली चोर येथे पत्रावळी शिवण्याचा पारंपारिक व्यवसाय.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही करतात ते काम.
शासनाकडून आर्थिक मदतीची गावकऱ्यांची मागणी.
उत्तम ब्राह्मणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माऊली चोर येथे बरेच वर्षापासून गावात एकच कुटुंब श्री शामराव दादूजी उईके हे राहत असून त्यांचे वय आज रोजी 81 वर्षाची आहे ह्यामध्ये वाडवडिलांपासून हा व्यवसाय सुरू आहे.
अत्यंत गरीब परिस्थिती मधून मार्ग काढून ते आजही आपला व्यवसाय करीत आहेत शेतीचे कामे करीत असताना सोकारी करणे ,कुंदा खोदणे ,नाल्या खोदणे, इत्यादी कामे करून हळूहळू आरक्षणामध्ये हे दोघेही पती-पत्नी ग्रामपंचायत सदस्य राहिले होते.
ह्यावेळी स्वर्गीय किसन नामदेवराव सरोदे हे सरपंच होते तेव्हा ते लोकांना आपल्या साध्या पद्धतीने बोलून सांगत होते अशे हे कुटुंब अत्यंत इमानदार शांत स्वभावी शासनाचा त्यांनी कोणत्याही प्रकारचा अजून पर्यंत लाभ घेतलेला नाही.
त्यांना आग्रह करून सुद्धा लाभ घेण्यास तयार होत नाही अशा मध्ये त्यांना सिलिंगची जमीन प्राप्त झाली होती परंतु तेथे वन विभागामुळे वन्य प्राण्यांचाच उपद्रवक आहे त्यामुळे पीक हाती येत नाही परंतु त्यांनी मात्र आजही आपला व्यवसाय सोडला नाही.
जुन्याकाळी म्हणजे पंचवीस तीस वर्षे अगोदर अक्षय तृतीया ,पितृ मोक्ष अमावस्या, लग्नकार्य, वाढदिवस , साक्षगंध इत्यादी कार्यक्रमाला नैसर्गिक पानांचीच पत्रावळी असायची सर्व पितृ मोक्ष अमावस्येला मात्र मोहाच्या पानांचा मान आहे असे सांगितले जाते अशावेळी पानांची झाडे दुर्मिळ आहे यामध्ये त्यांना विचारले असता पाने ,सुलट्या कुठून आणता तर त्यांनी मोहाचे पानं पळसाचे पान मोखळ, कंजरा ,पळसमंडळ ,वेणी , सालोड भगुरा ,या भागात जाऊन एक एक पान तोडून जमा करून आणावे लागते व जोंधळीच्या सुलट्या सुद्धा तयार करायला लागतात ही एकमेकांना पाने जोडून पत्रावळी तयार करणे सोपे नाही आता नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे नवीन पत्रावळी कागदी पत्रावळी तयार झाल्या असल्यामुळे त्यांना काम मिळत नाही.
आणि म्हणून त्यांचा आर्थिक व्यवहार सुद्धा आज रोजी कोसळलेला आहे परंतु आजही हे गृहस्थ मात्र आपला उदरनिर्वाह करतात जीवाचा आकांत करून धावपळ करीत असतात ह्यामधून ते आपला उदरनिर्वाह आजही भागवत असतात तेव्हा अशा ह्या प्रत्येक पत्रावळी शिवणारे कुटुंब जे आहेत त्यांना शासनाने काही प्रमाणात मदत करणे सुद्धा क्रमप्राप्त आहे तेव्हा यामध्ये यांच्यामध्ये धार्मिकता सुद्धा सामावली असून ते सार्वजनिक कामांमध्ये भाग घेतात विश्वासू म्हणून त्यांना बरेच जण प्राधान्य सुद्धा देतात तेव्हा यावर यांनाच नाही तर अशा अनेक प्रकारच्या हाच व्यवसाय उदरनिर्वाह भागवत असलेल्या कुटुंबीयांना शासनाने मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Comments