वाघोडाचे सरपंच पदी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.नारायण भगवे यांची निवड .
उपसरपंचपदी काँग्रेसच्या शशिकला बाळे .
रिक्त झालेल्या जागेवर सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक संपन्न.
उत्तम ब्राह्मणवाडे
वाघोडा पं.स.नांदगाव खंडेश्वरच्या रिक्त झालेल्या सरपंच पदी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते कॉ. नारायण भगवे यांची तर उपसरपंच पदी काँग्रेसच्या शशिकला अरुण बाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली . वाघोडा ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२१ मध्ये संपन्न झाली होती.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष - काँग्रेस आघाडी प्रणीत सहकार पॅनलने सात पैकी सहा जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते . विरोधी ढेपे गटाला केवळ एका जागेवर विजय मिळाला होता. सहकार पॅनलमधील काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाने अडीच -अडीच वर्षाचा कार्यकाळ वाटून घेतला होता.
सन २०२१ मध्ये काँग्रेसच्या जिविताताई विनोदराव जगताप यांची सरपंचपदी तर भाकपचे कॉ .ओमप्रकाश सावळे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली होती . अडीच वर्षानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यानी राजीनामा दिल्या नंतर दि १३ ऑक्टो.रोजी अध्यासी अधिकारी श्री .राजेश धवणे, तलाठी श्री.प्रविण रावेकर, ग्रा.पं. सचिव कु.योगिता चव्हाण यांचे उपस्थितीत
सरपंचपदी कॉ .नारायणराव भगवे व उपसरपंच पदी सौ. शशिकलाताई बाळे यांची निवड करण्यात आली . #( *कॉ* . *नारायण* *भगवे* हे गेल्या ५० वर्षापासून राजकारणात सक्रीय आहे . पक्षाचे शाखा सचिव ते जिल्हा कौंसिल सदस्य व शेतमजुर युनियन चे जिल्हाध्यक्ष या पदावर त्यांनी कार्य केले आहे . नांदगांव - चांदुर रेल्वे तालुक्यातील शेतकरी शेतमजुरांच्या अनेक आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवून कष्टकरी जनतेचे नेतृत्व केले आहे .माजी उपसरपंच असलेले कॉ .भगवे वाघोडा ग्रा. पं . मध्ये पाच वेळा सदस्य *राहीलेले* *आहे* .* *)*
यावेळी माजी सरपंच जिविताताई जगताप , ग्रा.पं. सदस्य स्मिता मेटकर , बेबीताई शिरकरे यांचे सह
भाकपचे जिल्हा सचिव कॉ सुनिल मेटकर , काँग्रेस नेते विनोद जगताप , ग्रा .पं .सदस्य तथा कृ . उ .बाजार समितीचे संचालक कॉ . ओमप्रकाश सावळे , तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजय ढाकुलकर ,दिपक भगत, संतोष बागळे , प्रकाश मेहेंगे , सुनिल गावनर, होमदेव ढाकुलकर, होमदेव घाटे, विलास जाधव, तुकाराम ठाकरे , विनायक मेटकर ,सचिन मेटकर , गजानन शिरकरे, ज्ञानेश्वर भगवे , एकनाथ मेटकर , सदाशीव मेहेंगे , मंगेश बिल्लेवार, रविंद्र मेटकर , मधुकर गाडवे ,सचिन करडे ,किसन भगवे , चंदू भांबुरकर , गजानन सुलताने , अरुण सारवे ,दिलीप भगत , मारोती मेहेंगे , ओंकार पाखरे , विवेक पाखरे , आशिष भगवे , धिरज मेटकर , अमित ढाकुलकर ,सचिन सुलताने , संतोषराव मोरे , श्रीकृष्ण वंजारी , प्रतिक गावनर , किशोर घाटे, रुतिक सुलताने , अजय भगत , भिमरावजी वानखडे , जानराव सोनोने , वैष्णव मेटकर ग्रा. पं .कर्मचारी अमोल मेटकर , पांडूरंग दुर्गे , अक्षय ढाकुलकर ईत्यादी गावकऱ्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला.
Comments