ज्वालामुखी रेणुकादेवी खंडाळा (खुर्द) एक शक्तीपीठ.....
घडतेय धार्मिक व सांस्कृतिक संपन्नतेचे दर्शन.
भक्तांच्या होतात मनोकामना पूर्ण.
उत्तम ब्राम्हणवाडे
अमरावती जिल्ह्यात मोठ्या धामधुमीत नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आणि परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले खंडाळा (खुर्द) येथील ज्वालामुखी माता रेणुका देवस्थान नवरात्रोत्सवासाठी प्रसिद्ध आहे या सुमारे ८५० वर्ष पुरातन आहे या ठिकाणी रेणुका आई या अचानक अवतरीत झाल्याचे गावकरी सांगतात.
महाराष्ट्रात कोल्हापूर,तुळजापूर, आणि माहूर असे तीन शक्तिपीठं आहेत तर नाशीक येथील सप्तशृंगी देवीला अर्ध शक्तीपिठाची मान्यता आहे. महाराष्ट्राला समृद्ध अशी शक्ती पूजनाची परंपरा व इतिहास आहे. विदर्भातील जी मोजकी प्राचिन शक्तिपीठ असतील त्यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा (खुर्द) हे नाव अग्रस्थानी आहे.
या ठिकाणी ज्वालामुखी रेणुका मातेचे मंदिर आहे तसेच परिसरातील प्राचिन प्रतिमांचा खजाना अध्यात्मिक, धार्मिक व सांस्कृतिक संपन्नतेचे दर्शन घडविते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अमरावती यवतमाळ महामार्गावर नांदगाव खंडेश्वर येथून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर खंडाळा (खुर्द) हे ज्वालामुखी आई रेणुकादेवीचे शक्तीपीठ आहे.
मंदिराचे पुजारी ह.भ.प.ध्यानेश्र्वर महाराज आमडारे यांचे वडील ह.भ.प.नारायण महाराज आमडारे हे या ठिकाणी इजान्यावर लक्ष ठेवण्यासाठी वास्तव्यास आहेत. त्यावेळी कधी काळी या ठिकाणी घनदाट जंगल होते या जंगलात रेणुकामातेचे छोटेसे मंदिर होते ,त्या मंदिराच्या परिसरात विविध प्रकारच्या मुर्त्या अस्ताव्यस्त पडून होत्या.त्यावेळी रेणुका मातेचे एका गावकऱ्यांच्या स्वप्नात जाऊन मी खंडाळ्यात येणार मला जागा द्या अशी मागणी केली होती.
त्यानुसार येथे देवी रेणुका अवतरीत झाल्याचे सुद्धा गावकरी सांगतात.येथे अत्यंत जुन्या बांधकामाचा आज विस्तार झालेला असून अत्यंत प्रशस्त असे मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे आणि नवीन बांधकाम सुद्धा सुरूच आहे. निसर्गरम्य पार्श्वभूमी असलेले हे ठिकाण नवरात्रीत गजबजलेले असते, भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नांदगाव खंडेश्वर येथून भल्या पहाटे दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते मंदिर परिसरातील निसर्ग सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालणारे आहे. मंदिराच्या काही अंतरावर असलेला गावतलाव सुद्धा भक्तांना भुरळ घालतो. कधीकाळी हे स्थळ रेणुकामातेचे मोठे शक्तीपीठ होते असे गावकरी सांगतात या येथील ज्वालामुखी रेणुका देवीची प्रतिमा प्राचिन विदर्भाच्या इतिहासात महत्वाची भर घालणारी आहे.
ही प्रतिमा स्वयंभू असून इसवी सन अकराव्या, बाराव्या शतकातील असण्याची दाट शक्यता आहे.येथील प्रतिमा ही माहूर येथील रेणुका देवीची प्रतिकृती असून एक अत्यंत जागृत असल्याचे येथे दर्षणाकरिता येणारे भाविक सांगतात.नवरात्री मध्ये संपूर्ण 10 दिवस येथे धार्मिक उत्सवाची रेलचेल असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी असते, नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येते. या दहा दिवसात मात्र खंडाळा (खुर्द) येथील रेणुकादेवी मंदिरात येथे यात्रेचे स्वरूप येत असल्याने हे मंदिर नाविन्यपूर्ण ठरते.
Comments