मंगरूळ चव्हाळा येथे सरपंच पदाची निवडणूक संपन्न.
सरपंच पदी काँग्रेसचे राजेश पारधी तर उपसरपंच पदी ठाकरे शिवसेनेचे निखिल देशमुख
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मंगरूळ चव्हाळा या गावांमध्ये सरपंच पदासाठी निवडणूक 13/7/2023 रोजी पार पडली. काँग्रेस आणि सेना महायुती चे 10 सदस्य अडीच वर्षा अगोदर निवडून आले होते अडीच अडीच वर्ष या फॉर्मुल्यामध्ये पहिले सरपंच पद ठाकरे गटाच्या शिवसेनेला देण्यात आले होते यामध्ये निलेश निबरते हे अडीच वर्ष सरपंच होते. शोभताई चवाळे ह्या उपसरपंच कार्यरत होत्या
15 ऑगस्ट नंतर निलेश निबरते व शोभाताई चवाळे यांनी राजीनामा दिला. 13 तारखेला नवीन सरपंचाचा निवडीचा कार्यक्रम झाला.
गावामध्ये सरपंच पदासाठी काँग्रेसचा उमेदवार होणार अशी चर्चा एक महिन्यापासून सुरू होती याकरिता काँग्रेसमधून उत्सुक तीन लोक उत्सुक होती 1) राजश पारधी . 2)शोभाताई लिलेश्वर चवाळे. 3) अश्विनी चवाळे. यामध्ये पक्षाच्या वरिष्ठांनी इच्छुक असलेल्या उमेदवारांमधून
सरपंच पदासाठी काँग्रेस पक्षाकडून राजेश हनुमंत पारधी अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती.
पण काँग्रेसचे उमेदवार शोभा लिलेश्वर चवाळे यांनी ऐईन वेळी फॉर्म भरला त्यामुळे निवडणूक झाली व राजेश हनुमंत पारधी यांना 6 मते मिळाली राजेश भाऊ हे विजयी झाले व शोभाताई चवाळे पराभूत झाल्या त्यांना 5 मते पडली.
उपसरपंच पदी. सेनेचे (ठाकरे गटाचे ) निखिल नागोराव देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकी करिता ग्रामपंचायतचे सर्व 11 सदस्य मतदानाला होते. माजी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य निलेश निंबरते ग्रामपंचायत सदस्य अतुल भाऊ ठाकूर,रामदास कोचोडे,सविता झोपाटे, रेश्मा भूषण शिरभाते. अश्विनी विनोद चवाळे,सुनिता ईश्वर टेवरे. लक्ष्मी पंकज खांडेकर. तसेच ग्रामसेवक रबडे साहेब. ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. अशा प्रकारे चुरशीच्या लढतीमध्ये राजेश हनुमंत पारधी यांचा विजय झाला.मंगरूळ चव्हाळा ग्रा. प. वर काँग्रेस पक्षाचा सरपंच झाला.
Comments