पाकिस्तानात रमली नाही म्हणून देवी आली वऱ्हाडात !
हिंगलासपूर येथील ७०० वर्षे जुनं ज्वालामुखी मंदिर.
भाविकांची मनोकामना करते पूर्ण.
उत्तम ब्राम्हणवाडे
पाकिस्तानातून एक बस काही महिन्यापूर्वी गावात आली. बसमध्ये स्त्री-पुरुष आणि लेकर होते. एक वेगळं नातं या गावाशी आहे. या नात्याची एक वेगळीच गुण आहे. बसमधील ही मंडळी जिज्ञासा आणि कुतुहलान सैरभैर होऊन परिसर न्याहाळत होती. ते त्यांच्यातल्या काहीतरी हरवल्याचा शोध हिंगलासपूरच्या मातीत घेत होते. वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर हिंगलासपूर हे केवल ५०० लोकवस्तीचं गाव. हे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येतं.
या गावात श्री ज्वालामुखी हिंगलाजदेवीचं प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या आणि इथल्या उत्सवांच्या आख्यायिका आणि कहाण्यादेखील तेवढ्याच रोमांचक आहेत. यातली एका आख्यायिकेचा संबंध तर थेट पाकिस्तानशी आहे.
पाकिस्तान ते वन्हाड प्रवास ब्रह्मादेवामुळे !
बलुचीस्थान (पाकिस्तान) हे देवीचं मूळ मानलं जातं ती शेकडो वर्षापासून भकत्तांच्या मनोकामना पूर्ण
करते, अशी भाविकाची श्रद्धा आहे तिथे अनेक पूजा आणि षोडशोपचार तिच्यावर होत नित्योपासनादेखील व्हायची. असं असलं तरी ज्वालामुखी देवी ही संतुष्ट नव्हती. तिला तिचा सच्चा भक्त हवा होता. तिने ही अडचण ब्रह्मदेवाजवळ सांगितली त्यावर ब्रह्मदेवाने तिला वन्हाडात जाण्याचा सल्ला दिला त्या भक्ताच्या शोधार्थ ती बसुचीस्थानातून थेट न्हातील अकोली येथे आली. अकोली हे अकोला जिल्ह्यातील एक छोटस खेड या गावाजवळ सत्य अरण्य' नावाच जंगल होत, तिथे अमृतगीर महाराज हे ज्वालामुखी हिंगलाजदेवी ची घोर तपस्या करत होते. श्री ज्वालामुखी देवीने अमृतगीर महाराजांची मदत घेतली मग त्यांना खरा भक्त मिळाला चिमणाजी महाराजांच्या रूपात देवीचा भक्ताचा शोध संपला ही आख्यायिका मात्र इथेच थांबत नाही. तिचा पुढचा प्रवास खऱ्या अर्थाने इथून सुरू होतो.
परकोटात देवीची स्थापना.
चिमणाजी हा सच्चा आणि निष्ठावान भक्त होता. त्याने देवीसाठी एक-दोन नव्हे तर तीन भव्य परकोट बांधलेत त्यात विशाल सभामंडप आणि बारदारी दीपमाळ उभारली. अन्य साधक आणि भक्तांसाठी महाकाय विहिरी बांधल्यात पावसाळ्यात या विहिरी तुडुंब भरतात. देवीला परमवैभवात ठेवण्याचा चिमणाजीने पूर्ण प्रयत्न केलेत. याच मंदिराला पुढ हिंगलाजदेवी मंदिर म्हणून नावलौकिक प्राप्त झाला. मग या गावाला हिंगलाज देवीच्याच नावावरून हिंगलाजापूर हे नाव पडल दिवसेंदिवस या गावाची कीर्ती पसरायला लागली, भाविकांचा जोढा गावाच्या दिशेने वळायला लागला.
इ.स. १३०३ मध्ये झाली पूर्तता आख्यायिकेनुसार ज्वालामुखी देवी चिमणाजी या भक्ताची परीक्षा घेत राहिली. एकापेक्षा एक अशा कठीण परीक्षातून चिमणाजीची भक्ती वारंवार सिद्ध होत गेली.
चिमणाजी सर्व कसोट्यावर खरे उतरले, अकोली या गावातील लोक हे दुष्ट प्रवृत्तीचे होते त्यामुळे हे गाव सोडावे असा निर्णय ज्वालामुखी देवीने घेतला शेलगुड है चिमणाजीचे मूळ गाव. त्याच गावाला जाणं देवीला योग्य वाटेल त्यानुसार या गावातील हनुमान मंदिरात देवीची पालखी आली. परमेश्वराविषयीची भावना बदलली की,परमेश्वर ते स्थानही बदलती देवी ज्वालामुखींनी तसं बोलून दाखवल त्यानुसार सात शिवार असलेल्या जंगलात रात्रीलाच ही पालखी पोहचल्याच मानतात. त्याच जागेवर इ. स. ९.३०३ मधे अमृतगीर महाराजांच्या नेतृत्त्वात भक्त चिमणाजीने भव्य मंदिर बाल देवीच्या प्रवासाची पूर्तता इथं झाल्याच भाविक मानतात.
असं जायचं दर्शनाला.
चैत्र आणि अश्विन या दोन्ही नवरात्रात विविध कार्यक्रमाची येथे रेलचेल असते. अनेक भक्त इथे वर्षभर दर्शनाला येतात नवरात्रात भक्तांची विशेष मांदियाळी असते. बडनेराहून अकोला महामार्गावर लोणी टाकळी हे गाव आहे. लोणी टाकळी गावातून आत हिंगलासपूर साठी फाटा फुटतो बडनेरा ते लोणी सहा ते आठ किलोमिटर आहे. तिथून जवळपास १५ किलो मिटरवर हे गाव आहे दुसऱ्या मार्गाने अमरावती ते यवतमाळ मार्गावरील धानोरा गुरव वरून पिंपळगाव बैनाई आणि तिथून हिंगलाजपूरला जाता येत.
गाडपगाड' उत्सव आणि दोन नवरात्र
शुद्ध अष्टमीला येथे होम-हवन असे अनेक विधी होतात. चैत्र महिन्यात गाड पागडचा हा उत्सव होतो. या उत्सवाला अनेक पिढ्यांची परंपरा आहे. या मंदिराचे संस्थापक चिमणाजी सत्ताजी भगत यांनी ही परंपरा सुरू केली असे मानतात.
नवरात्र उत्सवामध्ये येथे दूरध्वनी भाविक भक्त दर्शनाकरिता येत असतात.
Comments