माऊली येथील श्री अंबादेवी (भवानी ) मंदिर...
सुमारे २०० वर्ष पुरातन मंदिर.
दर्शना करीता भक्ताच्या लागल्या रांगा.
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माऊली (चोर) देवी येथील श्री अंबादेवी (भवानी) मंदिर हे अतिशय पुरातन असे मंदिर होते या मंदिराचा जिर्णोद्धार किमान 1988 पासून सुरु झालेला आहे ह्या संदर्भात सांगावयाचे झाल्यास किमान 200 वर्ष अगोदरचे परिसर तेथील असलेला जंगल ह्यामुळे तेथे गावाचे वास्तव्य नसावे म्हणून त्या मंदिराशेजारीच गावातून जळून नदी वाहत होती.
या नदीचे पात्र नदीचा पूर पाहता त्या मंदिराची उंची त्यावेळची अतिशय मोठी होती परंतु आता तिथे मात्र हळूहळू गाव वसायला लागले म्हणून रस्ते नाल्या गाव अशामुळे त्या मंदिराच्या येथे मुर्त्या स्थापन झाल्या त्यांची ओट्या ची उंची हळूहळू आता कमी व्हायला लागली अशांमध्ये एका ओट्यावर पाच मुर्त्या बसलेल्या आहेत.
त्या मूर्तीला भाविकांनी अनेक नाव देत अमरावतीची अंबादेवी, वणीची सप्तशृंगी देवी ,माहूरची रेणुका माता ,कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी , अशा प्रकारची नावे देऊन भक्तगण मोठ्या आनंदाने उत्साहाने आपली मनोभावे पूजा करीत असतात ज्यांचे कुलदैवत आहेत ते बरेच लांबून चैत्रामध्ये नवरात्रा मध्ये पूजा करिता येतात त्यावेळी तिथे सामूहिक स्वयंपाक सुद्धा होत होते.
असे ज्येष्ठ नागरिक किंवा ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी त्यावेळी पुरातन मंदिराचा कारभार सांभाळला यामध्ये स्वर्गीय श्री रामरावजी सरोदे ,स्वर्गीय रंगरावजी चोरे ,जनार्दन पंत कुलकर्णी ,मनोहर तिखिल,स्वर्गीय बापूरावजी पवार, व अनेक इतर ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारची माहिती देत होते तसेच त्यावेळी मंदिराच्या नावाने मंगळवार ला यात्रा भरत होती हळूहळू या यात्रेचे स्वरूप आता बाजारामध्ये आलेले आहे.
तेव्हा गावाची रचना पाहता गावामध्ये श्री विठ्ठल मंदिर, श्री महादेव मंदिर ,हनुमान मंदिर ,श्रीराम मंदिर, बौद्ध विहार ,शाळा त्याचप्रमाणे जळू नदीतीरी शंभू महादेवाचे मंदिर तर आहेच परंतु दुर्मिळ असे मंदिर श्री भक्त पुंडलिक महाराजांचे मंदिर सुद्धा येथे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने दौलत आहे असेही एक भक्त पुंडलिकाचे मंदिर माऊली चोर येथे आहे त्यामुळे या गावाला एक धार्मिक वारसा असा लाभलेला आहे तसेच श्री संत गाडगे महाराज 1952 मध्ये स्वर्गीय पुंडलिकराव चोरे यांच्या शेतामध्ये आलेले होते.
असे सुद्धा सांगितले जात होते तेव्हा गावाचा इतिहास पाहता गावामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने खेळीमेळीने एकमेकांना सांभाळून घेऊन गावातील लोक राहतात आता अलीकडे बऱ्याच प्रमाणात त्या मंदिराचा जिर्णोद्धार झालेला आहे काही प्रमाणात तीर्थक्षेत्र निधी सुद्धा एका हॉल करता प्राप्त झालेला होता जेव्हा आवश्यकता भासली तेव्हा तेव्हा ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने श्रमदान केलेच परंतु लोक वर्गणी सुद्धा मोठ्या प्रमाणात दिली म्हणून त्यांच्या श्रमदानाने त्यांच्या सहकाऱ्याने एक भव्य असं मंदिर माऊली चोर येथे आनंदाने डौलत आहे आणि म्हणून यापुढे आणखी जो जिर्णोद्धार करायचा आहे त्याकरता सुद्धा ग्रामस्थांनी अशाच प्रकारे सहकार्य करावे.
मदत करावी अशाच प्रकारे आपण गुण्यागोविंदाने आपल्या गावामध्ये नांदावे त्या देवीचे नवरात्र आता प्रारंभ झालेला आहे यावेळी त्यामध्ये घटस्थापना तसेच दररोज श्रीमद् भागवत कथा श्री बाभुळकर महाराज यांच्या वाणीने संपन्न होत आहे दररोज भजन आरती पूजा पाठ या कार्यक्रमाचे सुद्धा या कार्यक्रमांमध्ये 23 तारखेला नवमीला महाप्रसाद अष्टमीला होम हवन ..श्री संत तुकडोजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रबोधन वर कार्यक्रम कीर्तन दिनांक 19 तारखेला सायंकाळी आठ वाजता विजय माखने त्यांचे जाहीरपणे प्रबोधन कीर्तन होणार आहे असा हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होत आहे त्याकरता ग्रामस्थांनी भक्तजनांनी आपन योग्य असे सहकार्य करावे आवाहन मंदिराचे विश्वस्त राजेन्द्र सरोदे यांनी केले आहे.
Comments