मृतक कौशल्या लेंडे यांच्या कुटुंबास चार लाखांची मदत.
अंगावर विज पडून झाला होता मृत्यू.
चार लाखाचा धनादेश प्रदान.
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येणस येथे २८ सप्टेंबर रोजी कौशल्या ज्ञानेश्वर लेंडे यांचा शेतात अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला होता. या घटनेने त्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळला होता.
त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी चांदूर रेल्वे तहसील कार्यालयाकडून १६ ऑक्टोबर रोजी शासनाच्या वतीने ४ लाख रुपयांचा धनादेश आ. प्रताप अडसड यांच्या हस्ते मंगेश लेंडे यांना देण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार अनासने, मंडळ अधिकारी अमोल देशमुख, तलाठी राहुल भिलकर, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर,
सरपंच विशाल मेश्राम, सरपंच रंजना चौधरी, ग्रामपंचायत सदस्य शंकर इखार, सुनीता टेकाम, दीपाली कणसे आणि गावकरी मंडळी उपस्थित होती.
Comments