नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी आणि नगर अभियंता देण्यात यावा.


 नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय.

जिल्हाधिकारी लक्ष देतील काय ? नागरिकांचा प्रश्न.

उत्तम ब्राह्मणवाडे

 नांदगाव खंडेश्वर हे शहर तीस हजार लोकसंख्येचे नगरपंचायतचे  शहर आहे या शहरामध्ये आज अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. पिण्याचे पाणी, घरकुलचा  प्रश्न,स्वच्छतेचा प्रश्न, स्ट्रीटलाईटचा प्रश्न असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत कारण हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी या नगर पंचायत मध्ये  कायम स्वरुपी मुख्याधिकारी नसून त्याकरिता येथील कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते आजपर्यंत समोर यायला तयार नाही.
आमदारांनी सुद्धा या शहराला वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे. शहरातील अनेक नागरिकांचे घरकुले मंजूर होऊन पडलेली आहेत.  
पण या नगर पंचायत मध्ये नगर अभियंता नसल्याने ती सर्व घरकुले प्रलंबित पडलेली आहेत. शहरातील विकासाच्या कामाचे प्रश्न सुद्धा प्रलंबित पडली आहेत त्याकडे लक्ष द्यायला कुणीच नाही. 
अनेक समस्या जश्याच्या तशाच आहेत पण या नगर पंचायत मध्ये कोणताही अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही याबाबत मतदार संघाचे आमदार यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आली  परंतु त्यांनासुद्धा या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
 असे दिसून येत आहे  आठावड्यातील एक दिवस नगरअभियंता हे नांदगाव खंडेश्वरला येत नाही महिना,महिना होऊन जातो तरी ते येथे येत नसल्याने नागरिकांची अनेक दिवसापासूनची कामे रखडली आहेत.त्यामुळे शहरवासियांची अशी मागणी आहे की येथील नगर पंचायतला कायम स्वरुपी मुख्याधिकारी आणि नगर अभियंता त्वरित देण्यात यावा.अशी मागणी. बांधकाम कामगार 
 सागर भामुद्रे,शुभम रावेकर, सागर गटूले,मंगेश पडदे, मनोहर जाधव,अशोक नेवारे,गिरीश बावीसथळे सह अनेक नागरिकांनी केली असून त्वरित अंमलबजावणी न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात