संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयाला घातला घेराव.


 विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे छोटू मुंदे,एड.चेतन परडखे यांचे नेतृत्व.

तालुका कृषी अधिकारी यांचे पुन्हा अहवाल पाठविण्याचे आश्वासन.

उत्तम ब्राह्मणवाडे 

  नांदगाव खंडेश्वर येथील तालुका कृषी अधिकारी यांनी तालुक्यात मागील दोन महिन्यापूर्वी २० ते २५ दिवसाचा पावसाचा खंड पडला असताना सुद्धा हेतुपरस्पर पणे तो खंड हा कमी दिवसाचा पडला असल्याचा अहवाल आपल्या वरिष्ठ कार्यालयाला पाठविल्याने या तालुक्यातील असंख्य शेतकरी हे शासकीय मदती पासून वंचित ठेवण्यात आले असून याला सर्वस्वी नांदगाव खंडेश्वर येथील तालुका कृषी अधिकारी असल्याचा आरोप विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंदे यांनी केला असून शासनास पाठविलेला अहवाल चुकीचा असल्याने ती पुन्हा पाठविण्यात यावा.
 या मागणीला घेऊन विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेराव घालून ठिय्या आंदोलन केले.आणि जो पर्यंत आपणास लेखी आश्वासन मिळणार नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पावित्रा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतला.

 शेवटी तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालत सदर  अहवाल आपण वरिष्ठ कार्यालयास पुन्हा पाठविनार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन समाप्त करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंदे आणि अड.चेतन परडखे यांनी केले.

या आंदोलनाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. तालुक्यातील धानोरा गुरव,आणि पापळ या मंडळामध्ये मध्ये  पावसाचा खंड हा 20 दिवसाचा दाखवीला होता परंतु ती खंड हा 27 दिवसाचा होता.पावसाचा खंड हा 25 ते 27 दिवसाचा असताना तो खंड कृषी अधिकारी यांनी 20 दिवसाचा का दाखविला ? असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी यांना यावेळी उपस्थित केला.

 त्यामुळे तालुका कृषी अधिकारी यांनी झालेली चूक मान्य करीत आपण हा अहवाल पुन्हा पाठविणार असल्याचे आंदोलनकर्त्याना सांगितले. या आंदोलनामध्ये  विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंदे,अड चेतन परडखे यांचेसह शेतकरी अतुल भुजाडे,ललित तायडे,हरिदास राठोड,राजेश भाकरे, हरिदास बोरकर,अमोल सरोदे,क्रांती नवले, विकी वाहने,शरद बोरकर, निरंजन मुंदे,मोहन मुंदे,अनिल फुनसे,तेजस मुंदे, माणिक गोंडकर,
आकाश सोनवणे,मधुकर लोंगे,शालिक कालकर,राम शेंडे, आनंद डोंगरे,मनोज राऊत,वैभव महाजन,नामदेव राऊत,अशोक मेश्राम,आदित्य तायडे,वैभव गवई,राजू बोरकर,राजू हातागडे,
ऋषभ घरडे यांचेसह असंख्य शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.मागणी पूर्ण होताच शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालय नाऱ्यानी दणाणून सोडले होते.

   तालुक्यात मागील दोन महिन्यापूर्वी पावसाचा खंड 27 दिवसा ऐवजी तो कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत कमी दिवसाचा दाखवायला होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात येणार होते पण आमच्या या आंदोलनामुळे कृषी अधिकारी यांनी लावला तो  25 दिवसाच्या खंडाचा अहवाल मंजूर केला त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनाआता पीक विम्याचा लाभ मिळेल.आणि जोपर्यंत 
 शेतकऱ्याला पिक विम्याची भरपाई मिळणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही.
  छोटू मुंदे
 अध्यक्ष, विदर्भ शेतकरी संघर्ष समिती.

Comments

Popular posts from this blog

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

बडनेरा-अंजनगाव बारी-गोळेेगाव बस बंद प्रवासी नागरिक त्रस्त.

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !