नांदगाव खंडेश्वर तालुका अमरावती जिल्ह्यात गांजा तस्करीचा केंद्रबिंदू

 गांजा तस्करीत सर्वाधिक आरोपी तालुक्यातीलच का? 

शेकडो युवकांचे आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर.?                  

उत्तम ब्राह्मणवाडे

गेल्या तीन वर्षापासून नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गांजा तस्करी सुरू असून दिवसा गणिक या तस्करीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर तालुका गांजा तस्करीचा अड्डा बनल्याचे निदर्शनास येत आहे. आणि गेल्या वर्षभरात गांजा तस्करीत सर्वाधिक आरोपी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातीलच का? हा प्रश्न निर्माण होतो आहे  यामुळे तालुक्यातील शेकडो युवकांचे आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.     
                        
गांजा तस्करीत नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर परराज्यात सुद्धा अग्रेसर आहे. कारण गेल्या वर्षभरात उडीसा, छत्तीसगड व इतरही राज्यांमधून तालुक्यात गांजा तस्करावर फार मोठी कारवाही झाल्याचे निदर्शनास आले आहे.

 व सद्यस्थितीत सुद्धा आरोपी तुरुंगाची हवा खात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात परराज्यात  तालुक्यातील गांजा तस्करांनंवर कारवाही होत असताना तालुक्यात मात्र संबंधित प्रशासकीय यंत्रणेने झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे.
 कारण नांदगाव खंडेश्वर शहरासह अनेक खेडेगावातील युवक गांजा तस्करीत फार मोठ्या प्रमाणात वळल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात गांजा तस्कर हे नियोजनबद्ध पद्धतीने वेगवेगळी शक्कल लढवून आणि वेगवेगळे ग्रुप तयार करून चोरट्या मार्गाने फार मोठ्या प्रमाणात तालुक्यात इतर राज्यातून गांजा आणत असल्याचे होत असलेल्या कारवाहीतून दिसून येत आहे. 

तालुक्यात छुप्या मार्गाने होणारी गाजाची तस्करी उडीसा, छत्तीसगड, मध्यप्रदेश,मुंबई येथून राज्याची सीमा ओलांडून समृद्धी महामार्गाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर इंटरचेंज वरून होत असल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या महिन्याभरात गांजा तस्करानवर बडनेरा व तळेगाव दशासर पोलिसांनी जी कारवाही केली त्यामध्ये तालुक्यातीलच धानोरा व सुलतानपूर येथील गांजा तस्करांवर कारवाही झाली आहे. तालुक्यात होत असलेल्या गांजा तस्करीतील घटना क्रमामुळे तालुक्यात गांजा तस्कराचे फार मोठे रॅकेट सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.    
  नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गांजा तस्करानंवर उडीसा, छत्तीसगड तसेच अमरावती जिल्ह्यातील बडनेरा व चांदुर रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन मध्ये धडक कारवाही होऊ शकते तर ज्या तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे येथील पोलीस यंत्रणा निद्रिस्त का? असा प्रश्न निर्माण झाला होत आहे. तालुक्यातील गांजा तस्कर व पोलिसांचे साठे - लोटे तर नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे. आणि तालुक्यात वाढत्या तस्करीमुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली असून वाढत्या बेरोजगारी पायी माझा मुलगा गांजा तस्करीत सहभागी तर नाही ना? असे चिंतेचे सावट पालकांमध्ये निर्माण झाले आहे यावर वेळीच वरिष्ठ स्तरावरून  प्रशासकीय यंत्रणेने या गाजा तस्करीला लगाम लावला नाही तर, तालुक्यातील शेकडो बेरोजगार युवकांचे आयुष्य उध्वस्त होऊन गांजा तस्करीत नांदगाव खंडेश्वर तालुका महाराष्ट्राचा केंद्र बिंदू झाला आहे.

केंद्रबिंदू व्हायला वेळ लागणार नाहीत एवढे मात्र निश्चित!

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात