अमृत कलश यात्रेने नांदगाव शहरात निर्माण झाले आनंदमयी वातावरण.
समाजप्रबोधनपर पथनाटय आणि देखाव्यांनी वेधले लक्ष.
पंचायत समितीचे आयोजन.
उत्तम ब्राम्हणवाडे.
पंचायत समिती नांदगांव खंडेश्वरचे वतीने मेरी मीट्टी मेरा देश अभियान अंतर्गत अमृत कलश यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. कलश यात्रेत लहान थोरांपासुन सर्वांनी उत्साहपूर्ण जल्लोष साजरा केला. कलश यात्रेच्या माध्यमातून समाजातील सर्वघटकांनी एकत्र येवुन विकसीत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करण्याच्या आणि राष्ट्रभक्तीची भावना वृद्धीगंत करण्याचा संदेश देण्यात आला.यावेळी अमृत कलशाचे पुजन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर,आणि ठाणेदार विशाल पोळकर, यांनी करून शहराची पवित्र माती कलशात अर्पण केली तसेच येथील शहीद पंजाब उइके यांची वीरमाता बेबीताई उइके यांचा समान गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित असलेल्या सर्वांना पंचप्राण शपथ घेण्यात आली.अमृत कलश यात्रा शहरात मार्गक्रमण करीत असतांना मोठ्या संख्येने शहर वासियानी सहपत्नीक पवित्र माती कलशात अर्पण केली.शहरातील प्रत्येक चौकात या यात्रेचे जल्लोषात पुष्पवृस्थि करून स्वागत करण्यात आले.या यात्रेमध्ये शहरातील विविध शाळेच्या विद्याथ्र्यांनी साकारलेले समाजप्रबोधनपर थोर पुरुष यांचे देखावे,पथनाटय देखावे , लेझीम पथक विशेष यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.कलश यात्रामध्ये विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, महिला बचत गट, आंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते. अमृत कलश यात्रा यशस्वी करीता प्रकाश नाटकर, गटविकास अधिकारी, संजय झंझाड सहाय्यक गट विकास अधिकारी. प्रेमीला शेंडे गटशिक्षणाधिकारी ,डॉ.स्वप्नील मालखडे तालूका वैद्यकीय अधिकारी, विठ्ठल जाधव विस्तार अधिकारी, यांचेसह पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी,नांदगांव हायस्कूल व कनिष्ठ ; रामराव भोयर विद्यालय, एकलव्य गुरुकूल,स्कूल ऑफ स्मार्ट किड्स,वाय.ई.एस.इंग्लिश स्कूल तसेच इतरही शाळा,महाविद्यालय या अभियात सहभागी झाले होते.
Comments