शहरात हिंदू मुस्लिम बाधव हे सामाजिक ऐक्य जोपासण्याचे काम करीत आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत जगदाळे यांचे प्रतिपादन.

पोलीस स्टेशनच्यावतीने उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाना पुरस्कराचे वितरण.

उत्तम ब्राम्हणवाडे.

नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये सार्वजनिक उत्सवाच्या दरम्यान हिंदू मुस्लिम बांधव हे नेहमीच सामाजिक ऐक्याचे दर्शन घडउन आणतात ही बाब संपूर्ण जिल्ह्यातील दोन्ही समाजाने आदर्श घ्यावी अशी आहे नांदगाव खंडेश्वर तालुका हा अत्यंत शांतता प्रिय तालुका राहिला असून ही परंपरा कायम ठेवण्याचे काम भावी


पिढीने केले पाहिजे असे प्रतिपादन चादुर रेल्वे येथील उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत जगदाळे यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.तसेच पोलिस स्टेशनच्या परिसरामध्ये करण्यात आलेल्या परिसर सौंदर्य करण्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
नांदगाव खंडेश्वर येथील पोलिस स्टेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन ठाणेदार विशाल पोळकर यांनी केले होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत जगदाळे हे होते तर उद्घाटक म्हणून भारतीय सेनेचे माजी सुभेदार मेजर उत्तमसिह बैस हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल पोळंकर, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर,सदानंद जाधव, डॉ.नितीन टाले, डॉ.मंगेश पचगाडे,एड.प्रवीण ठाकरे,उमेश महाराज जाधव,मौ.इसामुद्दीन,अक्षय पारसकर,आदी उपस्थित होते.या कार्यक्रमामध्ये कंझरा येथील श्री.गणेश 


गणेशउत्सव मंडळ,यांना ग्रामीण भागातून प्रथम क्रमांक तर फुबगाव युवाशक्ती गणेशोत्सव मंडळ यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला तसेच शहरी भागातून प्रथम क्रमांक राधे गणेश मंडळ यांना आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार क्रांतिकारी भगतशिह गणेशोत्सव मंडळ यांना देण्यात आला.तसेच शिवाय गणेशोत्सव मंडळ,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या गणेश मंडळांना 
 प्रोत्साहन पर पुरस्कार देण्यात आले.


गणेशोत्सव विसर्जन दरम्यान नदीत बुडणाऱ्या मुलांचा प्राण वाचविनाऱ्या आदित्य मारोटकर आणि होमगार्ड विजय मारब्धे यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच आवेश खान या मुस्लिम बांधव यांनी आपल्या गाडीवर लक्षण डोफे या हिंदू बांधवाला बसऊन गणपतीचे विसर्जन करण्याकरिता नदीवर घेऊन गेले होते.या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडउन आणल्यामुळे यांचा सुद्धा शाल,श्रीफळ देऊन मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार विशाल पोळकर,संचालन पोलीस पाटील संजय जूनघरे यांनी तर आभार प्रदर्शन पी.एस.आय. प्राजक्ता नागपुरे यांनी केले.या कार्यक्रमाला तालुक्यातील पोलीस पाटील,शांतता समितीचे सदस्य,शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहा.ठाणेदार दर्शन दिकोडवार,सहा.ठाणेदार अमोल तुळजेवार यांचेसह

 निखिल मोरे,सतीश गावंडे,प्रशांत पोकळे,राजेश हिरेकर,ललित केळकर, राजेश हीरेकर,प्रफुल शहारे,सतीश राठोड,गणेश खंडारे वाहतूक पोलिस रणजित गवई या पोलीस कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Anonymous said…
Nice job

Popular posts from this blog

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

बडनेरा-अंजनगाव बारी-गोळेेगाव बस बंद प्रवासी नागरिक त्रस्त.