कृषी केंद्र संचालकांनी दिले कृषी अधिकाऱ्याना दिले निवेदन.

राज्य सरकारच्या नवीन कृषी विधेयकाला केला विरोध.

शहरातून काढला निषेध मोर्चा.

उत्तम ब्राम्हणवाडे.

 नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्व कृषी केंद्र हे दि. 2-11-2023 पासून सलग तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. कारण महाराष्ट्र शासनाने आणलेल्या नवीन कृषी विधेयकाच्या विरोधात सर्व कृषी केंद्र विक्रेते यांनी(आज दि.३१ रोजी)नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समितीच्या सभागृहात एका सभेचे आयोजन करून पंचायत

समितीचे कृषी अधिकारी  यांना निवेदन देऊन राज्य सरकारच्या नवीन कृषी विधेयकाला आपला विरोध दर्शविला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्व कृषी केंद्र हे या विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी सलग तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे सर्व कृषी केंद्र


संचालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हे विधयक जर राज्य सरकारने मागे घेतले नाही तर तालुक्यातील सर्व कृषी केंद्र हे बेमुदत  बंद ठेवणार असल्याचे सुद्धा त्यांनी निवेदनात म्हटले आहे. प्रस्थापित विधेयक क्रमांक 40,4,42,43 व 44 पाचही कायदे रद्द करण्यासाठी हे निवेदन देण्यात आले व बंदची हाक यावेळेस  देण्यात


आली.यावेळी निवेदन देताना नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाचे अध्यक्ष सुनील  शिरभाते,उपाध्यक्ष मदन काजे,सचिव जितेंद्र गावंडे, तालुक्यातील कृषी केंद्र दुकानदार दीपक भगत, सचिन जोगे,मोरेश्वर परळीकर,स्वप्निल ढगे,अक्षय


देशमुख,निलेश शिरभाते,शैलेश राजगुरे,वैभव इंजळकर,गोलू खराडे,रवींद्र  धार्मिक,गजानन वारे, राहुल  उडबगले,तुषार वानखडे, यांचेसह शेकडो कृषी साहित्य विक्रेते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात