कत्तलीसाठी जाणारे गोवंश पोलिसांनी पकडले.
नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनची कारवाई.
उत्तम ब्राम्हणवाडे
अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक अमरावती शशिकांत सातव , उपविपोअ सूर्यकांत जगदाळे, सपोनी विशाल पोळकर सर, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली दि. 09/11/2023 रोजी
पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर हद्दीत गोवंश जातीचे जनावरांची कारवाई करण्यात आली.आणि सर्व आरोपी विरुद्ध भादवीचे *कलम* 5, 5 (a) प्राणी संरक्षण अधिनियम,rw 11(1),(g)(d)(c),rw 83/177 mv act ,rw 119 bp act नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
असून फिर्यादी* Hc दिनेश वानखडे बन 2290 पो. स्टे.नांदगाव खंडेश्वर यांच्या फिर्यादीवरून सदर कार्यवाही करण्यात आली आहे.
आरोपी* ट्रक क्र. एम एच 40 वाय 0951 चा चालक हा जागेवरून फरार झाला आहे.या कार्यवाही मध्ये
गोवंश जातीचे एकूण 23 लहान मोठे बैल किंमत 11,25,000 हजार रुपये आणि ट्रक क्र एम एच 40 वाय 0951, किंमत 18,00,000 रू.असा एकुण 29,25,000 रुपयेचा माल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे. सदर घटना तालुक्यातील
शिंगणापूर फाटा,
तळेगाव ते कारंजा रोड.नांदगाव खंडेश्वर येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. असून ही घटना दि.9/11/2023 , वेळ 00.50 ते 01.50 दरम्यानची आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिंगणापूर फाट्यावर पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करीत असताना
नमूद ट्रक चालक याने पोलिसांना दुरूनच पाहून त्याचे ताब्यातील ट्रक मोक्यावर सोडून पळून गेला पंचासमक्ष नमुद ट्रक ची पाहणी केली असता त्या मध्ये गोवंश जातीचे 23 लहान मोठे बैल कत्तली करिता, ट्रक मध्ये कोंबून, बांधून ठेवलेल्या स्थितीत वाहतूक करीत असताना मिळून आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कार्यवाहीमध्ये
पोलिस उपनिरिक्षक दर्शन दिकोंडवार,
हेड कॉन्स्टेबल दिनेश वानखडे,
हेड कॉन्स्टेबल सतीश गावंडे, पोलीस कॉन्स्टेबल
प्रशांत पोकळे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल मेटे, सहाय्यक फौजदार प्रमोद मनवर यांचा समावेश होता.
Comments