विद्यार्थी बसले तंत्रनिकेतन कार्यालया समोर आमरण उपोषणावर..



शासन प्रशासन गार झोपेत..

 विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत..

उत्तम ब्राह्मणवाडे

वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी कारंजा लाड येथे,बी फार्म सेकंड इयरला शिक्षण घेणारे विद्यार्थी हे तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय अमरावती येथे आपल्या विविध मागण्या घेऊन उपोषणास् बसलेले आहेत.
त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, चांदूर बाजारसह इतरही तालुक्यातील  विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


 हे विद्यार्थि गेल्या तीन ते चार महिन्यापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक, आर्थिक नुकसान, जसे नियमित थेरी प्रॅक्टिकल होत नाही, प्राध्यापक रुंद अपुरे आहे, महाविद्यालयात प्रॅक्टिकल्स लॅब अवेलेबल नाही, प्रमुख्याने म्हणजे की विद्यार्थी महाविद्यालयात पेपर दिल्या करिता गेले असता त्यांना फक्त शुल्काची कारण देत पेपर पासून वंचित ठेवण्यात आले.

 महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांकडून घेणारे शुल्क विलंब हे नियमाचे बाहेर महाविद्यालय वसूल करत आहे. या बाबींमुळे विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय महाविद्यालयाकडून होत आहे.प्रमुख्याने कॉलेजचे मॅनेजमेंट वर्षा राठोड वर मनोज जैन हे विद्यार्थ्यांना नेहमी टॉर्चर व हरास्मेट करत असतात असे विद्यार्थ्यांनी सांगितले. सहसंचालक यांनी केलेल्या कारवाईनुसार संपूर्ण अहवाल हा महाविद्यालयाच्या विरुद्ध असून, प्रमुख्याने त्यांनी अहवालात शिफारस केले आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांना अट न लावता त्याचे त्वरित ऍडमिशन ट्रान्सफर दुसऱ्या संस्थेत बदल करून देण्या. वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयावर कठोर कारवाई करण्यात यावी, 

व या महाविद्यालयाची मान्यता रद्द करावी. अशी शिफारस सहसंचालक यांनी 05 ऑक्टोबर 23 रोजी संचालक यांच्याकडे केली. परंतु एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असून, त्यावर कुठलीही कारवाई होताना निर्दशनास येत नाही. व वरिष्ठांना विद्यार्थ्यांनी जाब विचारला असतात त्यांना उडी उडी चे उत्तरे त्यांच्याकडून मिळाली. संपूर्ण अहवाल हा महाविद्यालयाच्या विरुद्ध असून सुद्धा कारवाईका होत नाही. असा प्रश्न आम्हा विद्यार्थ्यांना पडला आहे.

 आज विद्यार्थ्यांवर उपोषणाची वेळ का पडली खरंच न्याय व्यवस्था विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम करीत आहे का..? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला. विद्यार्थ्यांना न्याय न मिळत नसल्याकारणाने नाईलाजाने अमर उपोषणा करण्याची विद्यार्थ्यांवर आज गरज पडली. 

आम्हा सर्वांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळेस विद्यार्थ्यांनी केली. यावेळी ओम मोरे,विजय कराळे, रोहित शेलोकार, पांडुरंग बराटे, काजल आडे ,वेदिका दहीभाते, अंशदा पोरे, साक्षी जाधव, श्रुती गौतम, सानिका काळे, जानवी जोंधळकर, कल्याणी आरेकर, कृतिका जोगदंड विद्यार्थ्यांसोबत पालक वर्ग सुद्धा उपोषणा दरम्यान बसले आहे.


न्याय न मिळाल्याने आम्हा विद्यार्थ्यांना नाईलाजाने अमर उपोषणाचे पाऊल उचलावे लागले.आज खरच या बाबीचे वाईट वाटते की, विद्यार्थी हे येणाऱ्या काळाचे भविष्य असून, त्यांच्यावर अन्याय होऊन सुद्धा त्यांना अभ्यासाच्या वयात उपोषण करावे लागत आहे हे खूप दैनंदिन बाब आहे. आज विद्यार्थ्यांवर उपोषणाचे वेळ कोणामुळे येत आहे... आणि का येत आहे. खरंच आपले न्याय व्यवस्था न्याय देण्याचे काम करत आहे का.. असा प्रश्न आम्हा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा  विद्यालयावर कठोर कारवाई होऊन मान्यता रद्द करावी याकरिता आम्ही उपोषणावर बसलो आहे-

 ओम कि. मोरे
विद्यार्थी. रा.नांदगाव खंडेश्वर

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात