नांदगाव खंडेश्वर स्टेट बँकेचा कारभार रामभरोसे.


  ए.टी.एम.सह स्वयम् मशीन तीन महिन्यापासून बंद

  खातेदारांना तासनतास* *राहावे लागते ताटकळत. 

 व्यवहाराच्या नोंदी सुद्धा मिळत नाहीत.

उत्तम ब्राम्हणवाडे

नांदगाव खंडेश्वर येथे नागरिकांच्या प्रचंड मागणी नंतर स्टेट बँक सुरू करण्यात आली खरी परंतु तीच बँक आता नागरिकांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरत असून या बँकेपेक्षा आता इतर दुसऱ्या बँकाच बऱ्या असे म्हणण्याची पाळी नागरिकांवर आली असून या बँकेचे सर्वच कर्मचारी मोठ्या प्रमाणात निर्ढावलेले असून येथे हम करेसो कायदा सुरू झालेला आहे.येथील कर्मचारी हे वेळेवर बँकेत तर येत नाहीच आणि आले तर खतेधारका सोबत तासन् तास ताटकळत उभे राहावे लागते तरीही येथील कर्मचारी त्यांना साधे विचारत सुद्धा नाहीत आणि त्यांना खतेधारकानी काही विचारले तर हे कर्मचारी खाते धारकावरच चवताळून उठतात अश्या तक्रारी नागरिक करू लागले आहेत. Ki
त्याच प्रमाणे येथील ए.टी.एम.मशीन ही गेल्या तीन महिन्यापासून बंद पडली असूनही ती मशीन सुरू करण्याचे सौजन्य येथील शाखा व्यवस्थापकांनी दाखविले असल्याने नागरिकांना पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.त्याच प्रमाणे येथील CDM मशीन सुद्धा तीन महिन्यापूर्वीच काढून नेलेली असल्याने खातेधारकांना बँकेत आपल्या खात्यामध्ये रक्कम जमा करता येत नसल्याने त्यांना ती रक्कम जमा करण्याकरिता सेवा केंद्राचा सहारा घ्यावा लागत आहे.

 खाते धारकांच्या कमी रक्कम सुद्धा येथे घेतल्या जात नाहीत त्याच प्रमाणे नागरिकांना आपल्या पासबुक मध्ये बँक व्यवहाराच्या नोंदी या सुद्धा गेल्या तीन ते चार महिन्यापासून बंद आहेत कारण येथील प्रिंटर स्वयम मशीन हीसुद्धा बंद पडल्या असून फक्त शोभेच्या वस्तू बनलेल्या आहेत त्यामुळे येथील खातेधारकांना एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

 तसेच येथील कर्मचारी हे तासनतास गप्पागोष्टी करण्यात आणि लंच टाईम मध्ये घालवितात त्यामुळे नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते याकडे शाखा व्यवस्थापक यांचे कोणत्याही प्रकारचे लक्ष असल्याचे दिसून येत नाही. या सर्व समस्येमुळे नागरिकांना स्टेट बँकेचा प्रचंड मनस्ताप होत आहे त्यामुळे नागरिकांच्या असंतोषाचा येथे कधीही स्फोट होऊ शकतो याकडे स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर तट्टूपणामुळे अनेक नागरिकांनी येथील आपल्या एफ डी काढून इतर बँकेत जमा केलेल्या आहेत तरीही येथील कर्मचारी हे सुधारण्याची काही नाव घेत नाहीत.

 तालुक्यासह शहरातील नागरिक हे आपली सर्व कामे सोडून बँकेत तासंतास उभे राहतात तरीही त्यांची कामे होत नसल्याने त्यांना पुन्हा कामासाठी दुसऱ्या दिवशी बँकेत यावे लागते त्यामुळे नागरिक या बँकेला प्रचंड कंटाळले आहेत त्यामुळे या बँकेपेक्षा इतर दुसऱ्या बँका बऱ्या असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

 सर्वच कर्मचारी करतात अप डाऊन.
- या बँकेतील सर्वच कर्मचारी हे दररोज अप डाऊन करीत असून बँकेत आल्यावरही ते नागरिकांची कामे करीत नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी येथे वाढते आणि कामकाज सुरू झाल्यावर अवघ्या काही तासातच त्यांचा लंचटाईम होतो त्यामुळे पुन्हा दोन ते तीन तासापर्यंत नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते आणि त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची घाई होते त्यामुळे नागरिकांची कामे येथे खोळंबली असून दहा मिनिटाच्या कामाकरीता त्यांना चक्क दोन दिवस लागत असल्याने या बँके पेक्षा ती नसलेली बरी असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत.


 नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.

या बँकेमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने बँकेचे कर्मचारी किती निगरगट्ट  मनाचे आहेत हे यावरून दिसून येते पूर्वी या बँकेमध्ये पिण्याच्या पाण्याचा एक वॉटर कुलर लावण्यात आला होता परंतु गेल्या अनेक महिन्यापासून तो वॉटर कुलर काढून टाकण्यात आल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकावे लागते संपूर्ण तालुक्यातून येथे नागरिक बँकेचे व्यवहारा करता येतात परंतु पिण्याचे पाणी नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडते पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांना चहाच्या कॅन्टीनचा सहारा घ्यावा लागतो परंतु तिथे सुद्धा चहा घेतल्याशिवाय पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे असल्या प्रकारामुळे येथील नागरिकांना तोंड दाबून भुक्क्यांचा मार सुरू असल्याचे दिसून येते नागरिक मात्र भीतीपोटी तक्रार करण्यास समोर येत नाहीत याकडे सुद्धा बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात