पिंपळगाव निपाणी येथील निलेश सोनोने यांच्या संशयास्पद मृत्यू..
मृत्यूचे गुढ कोळ्यातच ?
पोलिस प्रशासन मात्र सुप्तावस्थेत.
उत्तम ब्राम्हणवाडे
सविस्तर वृत्त असे की नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा पोलिस स्टेशन हद्दीतील
पिंपळगाव निपाणी येथे 19 रविवार 2023 रोजी निलेश सोनोने यांचा धरणाच्या मधोमध बेशरम झाडांच्या झुडपात मृतदेह बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला. तालुक्यातीलच शिवरा येथील मत्स व्यवसाय करणाऱ्या इसमाला दिसून आला दिसताचक्षणी त्यांनी शिवरा येथील पोलिस पाटील यांना कळविले शिवरा येथील पोलिस पाटीलांना माहिती मिळताच त्यांनी पिंपळगाव निपाणी येथील पोलिस पाटील चंद्रमणी नागदिवे यांना माहिती दिली.
धरण पिंपळगाव निपाणी हद्दीत येत असल्याने पोलिस पाटील यांनी पोलिस स्टेशन मंगरूळ चव्हाळा यांना फोनवरून घटनेची सूचना दिली. सूचना मिळताच मंगरूळ चव्हाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले मोठ्या प्रमाणात बघ्याची गर्दी असल्याने तसेच मयत यांचा लहान भाऊ यांनी ओळख पटवली की माझा भाऊ चार दिवसापासून बेपत्ता होता.
हा मयत व्यक्ती माझा भाऊच आहे. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून मृतकांचा लहान भाऊ मंगेश सोनोने यांच्या हाताने प्रेत धरणातून बाहेर काढले प्रथमदर्शनी पाहताच मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत दिसून आला.
पोटाचा कोथळा बाहेर पडलेला गुप्तांग कापलेले धारणातील बेशरम झाडाला बांधून ठेवण्याआधी जाळले असल्याचे दिसत होते पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शयविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
घटनास्थळावर परिसरातील बघ्याची गर्दी उलटली होती सर्वत्र एक चर्चा ऐकायला मिळत होती की
हा घातपात आहे कुणीतरी याला मारून जाळून मग धरणात बेशरमच्या झाडाला बांधून ठेवले. अशा चर्चा ऐकायला मिळत होत्या मयत निलेशच्या वडिलांनी म्हणतात माझ्या मुलाला रात्रीच्यावेळी खेकडे पकडण्यासाठी गावातील एका इसमाने नेले होते. तेव्हा पासून तो परत आला नसल्याने पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यांनंतर दोन तीन दिवसांनी धरणात मासोळी पकडण्याकरता गेलेल्या व्यक्तीला असता त्यांना काहीतरी बेशरमच्या झाडांच्या आत अडकलेले दिसले ते पाहण्यासाठी गेले असता तेथे कुणाचे तरी प्रेत आढळून आले.
तसेच त्यांनी शिवरा येथील पोलिस पाटील यांना कळविले अशाप्रकारे घटनाक्रम असून त्याआधारेच मृतकांच्या वडीलांनी गावातील दोन व्यक्तीचा रिपोर्ट पोलिस स्टेशनला दिला असून सुद्धा आता पर्यंत कोणाला ही अटक पोलिसांनी केलेली नाही. याबाबत शंका निर्माण होत आहे पोलिसांना कुणाचा दबाब आहे का? की हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांना मोठा मलिदा तर मिळाला नाही ना? अश्या चर्चा सध्या परिसरात जोरात सुरू आहे
मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी निश्क्रीय धर्म आपुला हे तर धोरण अवलंबिले नाही ना? अशाही संदेह सामान्य नागरीकांतून व्यक्त होत आहे कारण, असे की मंगरूळ चव्हाळा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले असून दारू विक्रेते, गांजा विकणारे, रेतीची तस्करी करणारे, असे अवैद्य धंद्यावाल्याची चांदीच चांदी असून मोठ्या प्रमाणात हप्ते वसूली होत असल्याची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
त्यामुळेच या घडलेल्या घटनेला मंगरुळ चव्हाळा पोलिस चौकशीला फाटा देत नाही ना?अशी शंका निर्माण झाली आहे
या घटनेची वरिष्ठांकडून दखल घेण्यात यावी अशी मागणी मृतकांच्या आई वडिलांकडून करण्यात येत आहे,
निलेशला न्याय मिळेल का?
अशा संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटतांना दिसत आहे.
Comments